केअरिंग हँड्स’च्या मदतीसाठी डी.एल.आर.सी.च्या वतीने रविवारी ‘रन टू एज्युकेट’चे आयोजन

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पुणे :    सूस येथील डी.एल.आर.सी. (ड्राईव्ह चेंज लर्निंग अँड रिसोर्स सेंटर) यांच्यातर्फे अनाथ, गरीब, गरजू लोकांसाठी काम करणाऱ्या केअरिंग हँड्स या सामाजिक संस्थेला मदत म्हणून ‘रन टू एज्युकेट’चे येत्या रविवारी (दि. ५ फेब्रुवारी) सकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे संचालक पवन अय्यंगार, अजय डालमिया व मोना डालमिया यांनी दिली.


या कौटुंबिक रनमध्ये सहभागी होऊन केअरिंग हँड्स या सामाजिक संस्थेला आर्थिक हातभार लावण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. या रनमध्ये सहभागी होण्यासाठी ९५०३०४५८७८ या क्रमांकावर किंवा डीएलआरसी डॉट इन (dlrc.in) या संकेतस्थळावर नावनोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Share this Newz