पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशनच्या वतीने पोलिसांना तिळगुळ वाटप

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पिंपरी :     पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने चिंचवड पोलीस स्टेशन आणि चिंचवड वाहतूक विभाग येथील पोलीस बांधवांना तिळगुळ वाटप करीत मकरसंक्रात उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी चिंचवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश जाधव, पोलीस उपनिरीक्षक शंभू रणवरे, हवालदार अमोल लावंड, पोलीस फ्रेंड सोशल वेल्फेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष गजाननभाऊ चिंचवडे, शुभम चिंचवडे, पुणे जिल्हाध्यक्ष सचिन लाड, पुणे जिल्हा उपाध्यक्ष कमलजीत सिंह, महिला उपाध्यक्षा संगिता कदम, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष कार्तिक गोवर्धन, उपाध्यक्ष प्रसाद माळगावकर, सेक्रेटरी शिवनाथ मांडे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष रणजित वडणे, सचिव प्रसाद सायकर, पिंपरी विधानसभा सचिव रामय्या हिरेमठ, संतोष पाचपुते, अनुज शहा आदी उपस्थित होते.

गजाननभाऊ चिंचवडे म्हणाले, की ऊन, वारा, पाऊस सोसत शहरातील रहदारी आणि गुन्हेगारीवर नियंत्रण राखणाऱ्या पोलीस बांधवांप्रती आपला स्नेह कायम राखून आदर व्यक्त करण्याचा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे. याच हेतूने पोलीस बांधवांना तिळगुळ वाटप करत त्यांच्यासोबत मकर संक्रात साजरी करण्यात आली.


Share this Newz