द न्यूज बिज् टाईम्स, पिंपरी : युवा नेते व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत सपकाळ यांच्या दिनदर्शिकेचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, बाबुराव चांदेरे, तनपुरे सर आदी उपस्थित होते.
अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले, की दिनदर्शिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचण्याची संधी असते. त्या माध्यमातून पक्षाची ध्येयधोरणे व कार्य कुटुंबातील प्रत्येक माणसापर्यंत पोहोचायला पाहिजे. यादृष्टीने या दिनदर्शिकेचे विशेष महत्त्व आहे. तसेच सामान्य माणूस हीच आपली शक्ती असून, साधेपणा जपत त्यांच्यापर्यंत पोहोचावे असा सल्ला प्रशांत सपकाळ यांना दिला.
या दिनदर्शिकेच्या उत्कृष्ट प्रकाशनाबद्दल प्रशांत सपकाळ यांचे कौतुक करत राजकारणामध्ये यशस्वी होण्याचा कानमंत्र दिला. तसेच पुढील पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीबद्दल पदाधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शन केले.
युवा नेतृत्वाला योग्य दिशा व संधी देण्याची अजित पवार यांची कार्यशैली व पद्धत पाहून खूप शिकायला मिळाले, असे प्रशांत सपकाळ यावेळी म्हणाले.
Leave a Review