पिंपळे गुरवमध्ये शोभाताई आदियाल व दुर्गाताई आदियाल यांच्यावतीने संविधान दिन उत्साहात साजरा 

आमदार लक्ष्मण जगताप व शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन
Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पिंपरी :    संविधान दिनानिमित्त पिंपळे गुरव येथे माजी नगरसेविका शोभाताई आदियाल आणि सामाजिक कार्यकर्त्या दुर्गाताई मानसिंग आदियाल यांच्यावतीने संविधान दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. 

सृष्टी चौक येथे आमदार लक्ष्मण जगताप व भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रचारप्रमुख शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमास सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील टोणपे, माजी नगरसेविका उषाताई मुंडे, माजी नगरसेविका वैशालीताई जवळकर, लक्ष्मीकौर आदियाल, राहुल जवळकर, बुद्धभूषणचे माजी अध्यक्ष शिवलाल कांबळे, युवा नेते अमरसिंग आदियाल, अरविंद कसबे, महेंद्रसिंग आदियाल, समशेरसिंह आदियाल, आशिष जाधव, गणेश जगताप, अनिसभाई पठाण, ऍड. विलास गायकवाड, मधुकर सोनवणे, चंद्रकांत गायकवाड, शिवलाल कांबळे, विजय चौधरी, संभाजी राठोड, डॉ. शशिकांत वगे, सुरेश सकट, राजेश सातपुते, ऍड. राजेश नितनवरे, तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे म्हणाले, की २६ नोव्हेंबर हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एक विशेष दिवस आहे. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताने औपचारिकपणे संविधान स्वीकारले. हे संविधान २६ जानेवारी १९५० रोजी लागू झाले. आपल्या देशाच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये डॉ. भीमराव आंबेडकर यांचा सर्वात महत्त्वाचा वाटा होता. त्यामुळे त्यांना आदरांजली वाहण्याचे प्रतीक म्हणूनही संविधान दिन साजरा केला जातो.

सामाजिक कार्यकर्त्या दुर्गाताई आदियाल म्हणाल्या, की आपल्या संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र भारतात राहण्याचा समान अधिकार दिला आहे. पाश्चिमात्य संस्कृतीच्या युगात देशातील तरुणांमध्ये संविधानाची मूल्ये रुजवणे हा संविधान दिन साजरा करण्यामागचा एकमेव उद्देश आहे.


Share this Newz