सांगवीत ५ डिसेंबरपासून लाठी-काठी, भाला, दांडपट्टा, ढाल – तलवार प्रशिक्षण

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पिंपरी :      अहिल्यादेवी होळकर शाळा मैदान, गजनन महाराज मदिरासमोर, जुनी सांगवी येथे ऐतिहासिक शिवकालीन मर्दानी खेळ (लाठी-काठी, भाला, दांडपट्टा, ढाल – तलवार इ.) यांचे प्रशिक्षण वर्ग येत्या ५ डिसेंबरपासून सुरू होत आहेत.

या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन १ डिसेंबर रोजी संपन्न होत असून, या कार्यक्रमासाठी नरवीर तानाजी मालुसरे यांचे थेट तेरावे वंशज सुभेदार कुणाल मालुसरे , लव्हेरी यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. या प्रशिक्षणाचे आयोजन आमदार लक्ष्मण जगताप व चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.

मावळातील युद्ध कला व शौर्यसंस्कृती जतन व संवर्धन करणारी तुळजाभवानी मर्दानी खेळ प्रशिक्षण व सांस्कृतिक सेवा संस्थेच्यावतीने हे प्रशिक्षण वर्ग सुरू होत असून, या प्रशिक्षण वर्गामध्ये पिंपरी चिंचवड मधील सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिवप्रेमी, पालकांना व वय वर्ष ५ पासून पुढे सर्वांना प्रवेश घेता येईल. हे प्रशिक्षण वर्ग आपली महाराष्ट्राची शौर्य संस्कृती असून, आपणही या प्रशिक्षणात सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष शस्त्र व युद्धकला अभ्यासक रवींद्र यांनी केले आहे.

यात सहभागी व्हावे असे आवाहन या प्रशिक्षण शिबिराच्या आयोजक सारिका कृष्णा भंडलकर (अध्यक्ष, डोनेट एड सोसायटी सांगवी) यांनी केले आहे. नाव नोंदणीसाठी संपर्कः ९५५२६२५९६१


Share this Newz