द न्यूज बिज् टाईम्स, पुणे : आर्मी वेलफेयर असोसिएशन (आवा) अंतर्गत स्पेशल मुलांसाठी चालविल्या जाणार्या आशा स्कूलमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
घर तिरंगा अभियानाचा संदेश प्रसार करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका पल्लवी शर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्पेशल मुलांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देश्याने स्कूलमध्ये चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि प्रत्येक मुलास पारितोषिक देण्यात आले. सदर शाळेत एकूण ३५ विशेष मुले आहेत. त्याचप्रमाणे स्वतंत्रता दिवसानिमित्त स्कूलमधील विशेष शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांमध्ये मिठाई वाटप करण्यात आली.
Leave a Review