पंचक्रोशी हायस्कूलच्या वाॅल कंपाऊंडसाठी दहा लाखांचा निधी देऊ – आमदार सुनील शेळके

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पुणे :       दारूंब्रे येथील पंचक्रोशी हायस्कूलचे मुख्याध्यापक नारायण पवार यांचे शैक्षणिक कार्य मोठे आहे. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडविले आहे. त्यामुळे आज अनेक जण विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत, असे प्रतिपादन मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके यांनी केले. तसेच पंचक्रोशी हायस्कूलच्या
वाॅल कंपाऊंडसाठी दहा लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा आमदार शेळके यांनी यावेळी केली.

वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटी इस्लामपूर संचलित दारूंब्रे येथील पंचक्रोशी हायस्कूलचे मुख्याध्यापक नारायण दादू पवार हे 31 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर 31 मे 2022 रोजी सेवानिवृत्त झाले. यानिमित्ताने हायस्कूलच्या 1994-95 च्या दहावीच्या बॅचच्या मुख्याध्यापक पवार यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. आमदार सुनील शेळके यांनी मुख्याध्यापक पवार यांचा शाल, श्रीफळ आणि विठ्ठल रुक्मिणीची मुर्ती भेट देऊन सत्कार केला. तसेच पवार यांच्या कार्याचे कौतुक करत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

हायस्कूलच्या 1994-95 च्या दहावीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक नारायण पवार यांचा जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांची पगडी आणि त्यांच्या पत्नी सह शिक्षिका वंदना पवार यांचा पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन गौरव केला.

या समारंभाला मावळचे आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटी इस्लामपूर संस्थेचे सहसचिव एॅड. धैर्यशील बाबा पाटील, सरपंच उमेश आगळे, उपसरपंच शांताराम वाघोले, पोलीस पाटील लक्ष्मणराव शितोळे, सदस्य अनिल वाघोले, श्रीकांत वाघोले, गणेश वाघोले, ईश्वर वाघोले, संदीप सोरटे यांच्यासह माजी सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माजी राज्यमंत्री बाळा भेगडे म्हणाले, शिक्षणाची ज्ञानगंगा अव्याहतपणे 31 वर्ष चालू ठेवण्याचे आणि ते पुर्णत्वाकडे नेण्याचे काम पवार सर यांनी केले आहे. हे आज हा कार्यक्रम पहात असतात लक्षात येते. त्यांना सेवानिवृत्तीनिमित्त मनापासून शुभेच्छा देतो.

वाळवा शिक्षण संस्था इस्लामपूरचे सहसचिव एॅड. धैर्यशील बाबा पाटील यांनी संस्थेच्या व शाखेच्या कामाचा आढावा आपल्या भाषणातून घेतला. आजपर्यंत संस्था शाखा आणि पवार सरांनी केलेल्या कामाची ही पोहोच पावती आहे, असे उद्‌गार त्यांनी काढले.

शिव व्याख्याते दिगंबर पडवळ यांचे ‘गुरू आणि शिष्य यांच्यातील नाते’ या विषयावर व्याख्यान झाले. त्यांनी विविध दाखले देऊन गुरू आणि शिष्याचे नातेसंबंध कसे असतात, यावर सविस्तर विवेचन केले.

सत्काराला उत्तर देताना मुख्याध्यापक नारायण पवार म्हणाले” आपल्या 31 वर्षांच्या सेवा काळात अनेक चांगले वाईट अनुभव आले. दारूंब्रे ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थ्यांनी हायस्कूलसाठी वेळोवेळी सहकार्य केले आहे. त्यामुळेच हायस्कूल आज एका वेगळ्या उंचीवर आहे. हायस्कूलमधील अनेक विद्यार्थी राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात उच्च पदावर काम करत आहेत. याचा मला अभिमान वाटत आहे. तसेच कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या 1994-95 च्या बॅचमधील सर्व विद्यार्थ्यांचा आणि ग्रामस्थांचा मी मनापासून ऋणी आहे.

दरम्यान, कवी विठ्ठल दळवी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन सांगवडेचे माजी सरपंच संजय मोकाशी, दारूंब्रेचे माजी उपसरपंच हिरामण सोरटे, ग्रामपंचायत सदस्य शरद भालेकर, रमेश लोहोकरे, रामदास ठाकर, नवनाथ वाल्हेकर, विलास ढमाले, कचरू सोरटे, नयना वाघोले, जयश्री वाघोले, अरुणा शितोळे, मनिषा भोंडवे, शकुंतला सोरटे अनिता जाधव, सुप्रिमा गायकवाड, वर्षा वाघोले, विद्या गायकवाड आदी विधार्थी व विद्यार्थिनींनी यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक किशोर गुरव आणि माजी विद्यार्थी संजय मोकाशी यांनी केले. तर हिरामण सोरटे यांनी आभार मानले.


Share this Newz