शलाकींच्या वैद्यकीय परिषदेत डोळ्यांच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया व अत्याधुनिक तंत्रज्ञानावर सखोल चर्चा

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पुणे : डोळ्यांच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांवर चर्चा, अत्याधुनिक तंत्रज्ञानावर व्याख्याने, शस्त्रक्रियांचे थेट प्रक्षेपण, नवीन सर्जनसाठी वेट लॅब प्रशिक्षण, रेकॉर्ड केलेल्या शस्त्रक्रियांवर चर्चा, आयुर्वेदातील प्रख्यात शल्यचिकित्सकांनी दिलेली माहितीपूर्ण व्याख्याने अशा विविध अंगांनी वैद्यकीय परिषदेमध्ये सहभागी झालेल्या शलाकींसाठी परिषद अतिशय महत्वाची ठरली आहे. या परिषदेचे महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नॅशनल कौन्सिल ऑफ इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन, आयुष विभागापासून सर्वत्र कौतुक केले जात आहे.

असोसिएशन ऑफ शलाकी महाराष्ट्र राज्यतर्फे ‘सिनर्जी 2022’ अंतर्गत शनिवार (दि30) एप्रिल आणि रविवार (दि.1) मे अशा दोन दिवस पुण्यातील राजा बहादूर मिल रोड, संगमवाडी येथील हॉटेल शेरेटन ग्रँडमध्ये ही वैद्यकीय परिषद अतिशय उत्साहात पार पडली. या परिषदेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनचे डॉ. दिलीप वांगे
‘सिनर्जी 2022’ या वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. राजेश पवार, असोसिएशन ऑफ शलाकी महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र लाहोरे, प्रसिध्द नेत्रतज्ज्ञ डॉ. अभिजीत आग्रे, डॉ. दिलीप पुराणिक, डॉ. समीर रासकर,डॉ. मंजिरी केसरकर, माजी अध्यक्षा डॉ. संगिता साळवे, डॉ. राधेश्याम झेंडे, डॉ. संदीप निमसे यांच्यासह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या परिषदेमध्ये 450 हून अधिक शल्यचिकित्सकांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

वैद्यकीय परिषद यशस्वी झाल्यानंतर याबाबत माहिती देताना आयोजक म्हणाले की, या परिषदेमध्ये नेत्र शस्त्रक्रियांसाठी नवीन तांत्रिक प्रगतीवर व्याख्याने झाली. शल्यचिकित्सकांनी केलेल्या शस्त्रक्रियांचे लाईव्ह प्रक्षेपण झाले. असे प्रक्षेपण आजपर्यंत कोणत्याच वैद्यकीय परिषदेमध्ये झाले नव्हते. त्यामुळे या वैद्यकीय परिषदेचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. नवीन सर्जनसाठी वेट लॅब प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

रेकॉर्ड केलेल्या शस्त्रक्रिया आणि विविध गुंतागुंतीच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रियांवर प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या नेत्रतज्ज्ञांनी आपले अनुभव शलाकींबरोबर शेअर केले. शुश्रुत हे आयुर्वेद डॉक्टर आणि शस्त्रक्रियेचे प्रणेते आहेत. ज्यांनी डोळ्यांच्या शस्त्रक्रियेचा शोध लावला आणि त्यांच्या पद्धती आणि तंत्रज्ञानाचा अवलंब करून सर्व नेत्र शल्यचिकित्सकांनी शस्त्रक्रिया अत्याधुनिक पध्दतीने कशा सुरू केल्या याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

शल्यचिकित्सक आयुर्वेद औषध आणि तंत्रज्ञानासह आधुनिक नेत्र शस्त्रक्रियेच्या ज्ञानासह तांत्रिकदृष्ट्या प्रगत आहेत. ऑप्थॅल्मिक मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांनी प्रदर्शनात उपकरणे, औषधांची माहितीचे स्टाॅल उभारले होते.

तसेच वेट लॅब म्हणजे मॉडेल डोळ्यावरील कठीण शस्त्रक्रिया किंवा बकरीच्या डोळ्यावर प्रत्यक्षात शस्त्रक्रिया करण्याचे
प्रशिक्षण देण्यात आले. परिषदेमध्ये सहभागी झालेल्या सर्व शलाकींनी तांत्रिक प्रगत परिषदेसाठी आयोजकांचे भरभरून कौतुक करत अभिनंदन केले.

असोसिएशन ऑफ शलाकी महाराष्ट्र राज्यतर्फे ‘सिनर्जी 2022’ अंतर्गत घेण्यात आलेल्या या वैद्यकीय परिषदेचे महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नॅशनल कौन्सिल ऑफ इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन, आयुष विभागाच्या प्रमुखांनी असोसिएशन ऑफ शलाकी संघटनेला शुभेच्छा पत्र पाठवून कौतुक केले आहे.


Share this Newz