इंदोरी सोसायटी अध्यक्षपदी मनोहर काशिद, तर उपाध्यक्षपदी निवृत्ती हिंगे

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पुणे : इंदोरी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी मनोहर महादू काशिद यांची, तर उपाध्यक्षपदी निवृत्ती तुकाराम हिंगे यांची बिनवरोध निवड करण्यात आली आहे. सहकारी संस्थेत राजकारण नको, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या संगनमताने १२ संचालकपदाच्या जागा बिनविरोध झाल्या होत्या.

शुक्रवारी(दि.२९) सहाय्यक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी वंदना तळपे यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी सचिव गणेश गाडे,
संचालक प्रवीण भापकर, आबासाहेब काशीद, विठ्ठल ढोरे, अशोक मराठे दिलीप ढोरे, श्रावण शिंदे, अरूणाबाई भेगडे, सुलोचना काळे, पोपट खुडे, दीपक शेवकर आदी उपस्थित होते.


Share this Newz