सांगवी विकास मंचच्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त आज (शनिवारी) सायंकाळी प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पुणे : 

समाजसेवेचे व्रत घेऊन स्थापन करण्यात आलेल्या सांगवी विकास मंचचा सातवा वर्धापनदिन आणि स्वराज्यरक्षक छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘जागर शिव – भीम विचारांचा’ या शिवसेनेचे उपनेते व इतिहास अभ्यासक प्रा. नितीन बानगुडे पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम आज (शनिवार दि.16) सायंकाळी 6.00 वाजता जुनी सांगवीतील गजानन महाराज मंदिरासमोरील मैदानावर होणार आहे. नागरिकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांगवी विकास मंचचे अध्यक्ष महेश हरिश्चंद्र भागवत व नीलिमा महेश भागवत यांनी दिली.


Share this Newz