घोलप महाविद्यालयामध्ये इंटलेक्चुअल प्रॉपर्टी शॉर्ट टर्म कोर्सचे उद्घाटन

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पुणे : 

विद्यार्थ्यांना क्रमिक अभ्यासक्रमाबरोबरच उद्योग व व्यवसाय क्षेत्राशी निगडीत मूलभूत संकल्पनांची माहिती व्हावी, या उद्देशाने सांगवी येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील आयक्युएसी समिती, वाणिज्य विभाग आणि सुजाता इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने वाणिज्य विभागातील तृतीय वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स लॉ’ या शॉर्ट टर्म कोर्सचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी आयक्युएसी समिती समन्वयक डॉ. संगीता जगताप, समन्वयक डॉ. नरसिंग गिरी, सुजाता इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजीचे अॉपरेशन मॅनेजर दीपक व्यास यांची विशेष उपस्थिती होती.

प्रास्ताविक करत असताना शॉर्ट टर्म कोर्स समन्वयक डॉ. नरसिंग गिरी यांनी शॉर्ट टर्म कोर्स संकल्पनेची ओळख विद्यार्थ्यांना करून देत बदलता अभ्यासक्रम व चॉइस बेस्ड क्रेडिट सिस्टीम बद्दल सविस्तर माहिती दिली.
आपल्या मनोगतामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी पदवी घेणे हे विद्यार्थ्यांचे अंतिम उद्दिष्ट नसून प्राप्त शिक्षणाचा वापर करत समाजामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची गरज असल्याचे नमूद केले. त्याचबरोबर नवीन अभ्यासक्रमांची ओळख करून घेत असताना विद्यार्थ्यांना प्रश्न पडले पाहिजेत असा आग्रह धरत विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्याचे आवाहन केले.

‘इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स लॉ’ या विषयावर मार्गदर्शन करत असताना इन्फोसिस कंपनीमध्ये वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून कार्यरत राजेंद्र गवते यांनी इंटलेक्चुअल प्रॉपर्टी म्हणजे काय याची ओळख करून देत त्याचे प्रकार व महत्त्व स्पष्ट केले. त्याचबरोबर प्रत्येकाला आपल्या मालमत्तेचे संरक्षण करण्याचा अधिकार आहे असे स्पष्ट करत ट्रेडमार्क, पेटंट, कॉपीराइट, इंडस्ट्रियल डिझाईन, लेआऊट डिझाईन, ट्रेड सर्व्हीस या घटकावर सादरीकरणासह विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रकाश पांगारे तर आभार प्रा. ऋषिकेश हिवाळे यांनी मानले. याप्रसंगी वाणिज्य विभागातील तृतीय वर्षाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटन सत्राच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

 


Share this Newz