सारिका कृष्णा भंडलकर यांच्यातर्फे महिलांसाठी झुंबा प्रशिक्षण वर्गाचे मोफत आयोजन

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पिंपरी :

डोनेट एड सोसायटी, सांगवी या संस्थेच्या अध्यक्षा सारिका कृष्णा भंडलकर यांच्या वतीने सांगवी आणि परिसरातील महिलांमध्ये आरोग्यविषयक जागृती व्हावी, त्यांचे आरोग्य सुधारावे या उद्देशाने सांगवीमध्ये झुंबा प्रशिक्षण वर्गाचे मोफत आयोजन करण्यात आलेले आहे.

गेल्या 21 मार्चपासून हा वर्ग सुरू करण्यात आलेला असून, दररोज एक तास हा प्रशिक्षण वर्ग सुरू असणार आहे. आरोग्यासाठी असणारे इतर पूरक व्यायाम, योगा हेही याच्यामध्ये घेण्यात येणार आहेत. तसेच लहान मुले आणि मुलींसाठीही यामध्ये विशेष झुंबा नृत्याची प्रशिक्षणाची बॅच घेण्यात येणार आहे ( SPECIAL KIDS BATCH).

सारिका भंडलकर यांनी सांगितले, की मुली व महिलांसाठी झुंबा प्रशिक्षण वर्गात जुनी सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव भागातील मुली आणि महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. डो

नेट एड सोसायटीच्या अध्यक्षा सारिका कृष्णा भंडलकर (गमरे) यांच्या वतीने सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव भागातील महिलांसाठी सांस्कृतिक मूल्ये, वारसा, परंपरा यांची जपणूक करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. याचाच एक भाग म्हणून या प्रशिक्षण वर्गाचे मोफत आयोजन करण्यात आलेले आहे.

 सहभागी होण्यासाठी 7709727272 किंवा 9561383838 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सारिका कृष्णा भंडलकर यांच्यावतीने करण्यात आले आहे.


Share this Newz