पिंपळे गुरव येथील जिनियस क्लासेसच्या वतीने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पिंपरी : 

दहावी व बारावीची परीक्षा म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचे दडपण न घेता सकारात्मक दृष्टिकोन ठेवून धैर्याने या परीक्षेला सामोरे जावे असे आवाहन पिंपळे गुरव येथील कार्यक्रमाप्रसंगी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी विद्यार्थ्यांना केले.

पिंपळे गुरव येथील जिनियस क्लासेसच्या वतीने मुक्तांगण लॉन्स येथे दहावी व बारावी च्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा समारंभाचे आयोजन करण्यात आले . या कार्यक्रमास महापौर माई ढोरे, शिवव्याख्याते इंद्रजीत भोसले, सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे, पोलीस निरीक्षक (वाहतूक ) सतिश नांदुरकर, कै.शकुंतलाबाई शितोळे विद्यालयाचे प्राचार्य शिवाजीराव माने, कोचिंग क्लासेस असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष प्रा. उमेश बोरसे साहित्यिक, लेखक व निवेदक श्रीकांत चौगुले, प्रसिद्ध सनई चौघडा वादक रमेश पाचंगे, धन्य तुकोबा समर्थ फेम नामदेव तळपे आदींसह क्लासच्या संचालिका तेजस्विनी महादेव मासाळ, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी जिनियस क्लासेमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

उपस्थित मान्यवरांनी क्लासेस च्या वतीने केलेल्या अध्यापन कार्याचे कौतुक केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता क्लासच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आल्याने त्यांचा आत्मविश्वास उंचावल्याचे मत उपस्थित विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. मुलांना उत्तम प्रकारचे शिक्षण उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकांनी क्लासचे आभार मानले.

या कार्यक्रमास विशेष सहकार्य करत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिल्याबद्दल आमदार लक्ष्मणभाऊ जगताप कला व क्रीडा अकॅडमी, कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठान, मुक्तांगण महिला गृहउद्योग संस्था, सांगवी पिंपळे गुरव पत्रकार संघ आदींचे व उपस्थित मान्यवरांचे जिनियस क्लासेस परिवाराच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.


Share this Newz