द न्यूज बिज् टीम, पिंपरी :
डोनेट एड सोसायटीच्या अध्यक्षा सारिका कृष्णा भंडलकर (गमरे) यांच्या वतीने सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव भागातील महिलांसाठी सांस्कृतिक मूल्ये, वारसा, परंपरा यांची जपणूक करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. याचाच एक भाग म्हणून सारिका कृष्णा भंडलकर यांच्या तर्फे महिलांसाठी रांगोळी आणि मेहंदी प्रशिक्षण वर्गाचे मोफत आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सर्व महिलांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

येत्या सोमवार व मंगळवार दिनांक 24 व 25 जानेवारी रोजी दुपारी १ ते ३ या वेळेत स्वप्न पार्क, काटेपुरम चौकाजवळ, नवी सांगवी या ठिकाणी या वर्गाचे आयोजन करण्यात आलेले आहे. वय वर्ष 10 पुढील मुली व महिला या वर्गामध्ये भाग घेऊ शकतील.
सारिका भंडलकर यांनी सांगितले, की मुली व महिलांसाठी आयोजित या कार्यशाळेत विविध प्रकारच्या रांगोळी व मेहंदीच्या डिझाईन, तसेच त्यातील बारकावे, क्लृप्त्या शिकता येणार आहेत. सर्व सहभागिंना प्रमाणपत्रही प्रदान करण्यात येणार आहे. त्यामुळे जुनी सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव भागातील मुली आणि महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
सारिका कृष्णा भंडलकर यांच्या तर्फे महिलांसाठी रांगोळी आणि मेहंदी प्रशिक्षण वर्गाचे मोफत आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सर्व महिलांना प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी 9503834888 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सारिका कृष्णा भंडलकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.







Leave a Review