द न्यूज बिज् टीम, पिंपरी :
पिंपळे गुरव येथील तानाजीभाऊ जवळकर सोशल फाउंडेशनच्या वतीने नागरिकांच्या सोयीसाठी मोफत युनिव्हर्सल पास (स्मार्ट कार्ड) व कोव्हिड लसीकरण प्रमाणपत्र बनवून देण्याच्या योजनेचा शुभारंभ करण्यात आला असून, या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या उपक्रमाच्या शुभारंभ कार्यक्रमास राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष शामभाऊ जगताप, काँग्रेसचे नेते संदेश नवले, युवा नेते तानाजीभाऊ जवळकर, युवा नेते अमरसिंग आदियाल, श्री गणेश सहकारी बँकेचे संचालक अंकुश आप्पा जवळकर, पिंपळे गुरव राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा तृप्तीताई जवळकर, माजी नगरसेवक शिवाजी पाडुळे, बाळासाहेब पिल्लेवार, मधुकर रणपिसे महाराज, बाळासाहेब काशीद, दिपकशेठ जवळकर, अतुल काशीद, गणेश जगताप, दिपक काशीद, जितेंद्र जवळकर, नितीन चौधरी, गणेश जवळकर, अतिश जवळकर, विनोद रत्नम, तुषार पोळ, शंकर तात्या जगताप, अरुण जाधव, राहुल चोथवे आदी उपस्थित होते.
ज्येष्ठ काँग्रेस नेते संदेश नवले यांनी तानाजी जवळकर यांनी आयोजित केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. तानाजी जवळकर व त्यांचा परिवार नेहमीच पिंपळे गुरव परिसरातील नागरिकांसाठी अनेक स्तुत्य उपक्रम राबवत असतात. नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घेतात. आगामी महापालिका निवडणुकीमध्ये तानाजीभाऊ जवळकर व सहकारी यांना सहकार्य करण्याचे आवाहन नागरिकांना केले.
ज्येष्ठ नागरिक भोळे काका यांनी या योजनेमुळे नागरिकांच्या प्रवासाच्या, गावाला जाण्यायेण्याच्या अडचणी दुर होतील.
शिवाजी पाडुळे यांनी प्रास्ताविक, तर दत्तात्रय कदम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.







Leave a Review