द न्यूज बिज् टीम, पुणे :
सर्वांनाच काळजी घ्यायला लावणारी बातमी पिंपरी चिंचवड शहरातून येत आहे. नायजेरियातून पिंपरी चिंचवड शहरात आलेल्या 52 वर्षीय व्यक्तीचा वायसीएममध्ये मंगळवारी उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. आज त्यांचा ‘ओमायक्रॉन’चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.
पिंपरी चिंचवड शहरात ओमायक्रॉनचे नवीन ३ रुग्ण आढळले असून, यामध्ये २ महिला, एक पुरुष रुग्णाचा समावेश आहे. त्यापैकी १ रुग्ण नायजेरियातून आला असून, २ संपर्कातील आहेत. त्यातील नायजेरियातून आलेल्या रुग्णाचा मंगळवारी उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांचा ‘ओमायक्रॉन’चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
आजपर्यंत परदेशातून शहरात आलेले व त्यांच्या संपर्कातील अशा १५९१ जणांची तपासणी करण्यात आली. त्यातील १४९५ जणांचे अहवाल प्राप्त झाले. परदेशातून आलेले ३२ तर त्यांच्या संपर्कातील २८ जण पॉझिटीव्ह आले. तर, १४३७ जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले. परदेशातून आलेल्या ३२ पॉझिटीव्ह रुग्णांपैकी १४ जणांना ओमायक्रॉनची बाधा झाली.
संपर्कातील २८ पॉझिटीव्ह रुग्णांपैकी ११ ओमायक्रॉन पॉझिटिव्ह होते. तर, रँन्डम तपासणीत १ रुण ओमायक्रॉन पॉझिटीव्ह आला. १५ जण ओमायक्रॉन संसर्गमुक्त झाले आहेत. तर, ११ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून देण्यात आली आहे.







Leave a Review