दुपारपाळीमध्येही पासकेंद्र राहणार सुरू; नगरसेवक शशिकांत कदम यांच्या प्रयत्नांना यश

Share this Newz

द न्यूज बिज् टीम, पिंपरी : 

गेल्या कित्येक वर्षापासून मागणी होत असलेल्या पिंपळे गुरव येथील पीएमपीएमएल पासकेंद्राची वेळ वाढविण्यात आल्याने विद्यार्थी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

याबाबत बोलताना नगरसेवक शशिकांत कदम यांनी सांगितले, की गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थी व नागरिकांमधून पीएमपीएमएलच्या पास केंद्राची वेळ वाढविण्याची मागणी होती. पिंपळे गुरव, नवी सांगवी, दापोडी, कासारवाडी, पिंपळे सौदागर, रहाटणी, काळेवाडी या परीसरातील जेष्ठ नागरीक, विद्यार्थी व कर्मचारी यांच्याकडून ही मागणी होती. सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेतच पास केंद्र उघडे सुरू असायचे. त्यामुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला आदींची गैरसोय होत होती. ही समस्या लक्षात घेऊन आमदार लक्ष्मण जगताप, माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पीएमपीएमएल’कडे पाठपुरावा करून  दुपारपाळीमध्ये सुद्धा दुपारी 2 ते सायंकाळी 9 या वेळेत पासकेंद्र चालू करून घेण्यात आले आहे.

दुपारच्या वेळेतही पासकेंद्र सुरू झाल्याने विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, तसेच सर्वच स्तरातून समाधान व्यक्त केले जात आहे.


Share this Newz