द न्यूज बिज् टीम, पुणे
भारतामध्ये सणासुदीचा उत्साह दिसतो आहे आणि या काळात शेतक-यांच्या वाहतूक व शेतीसंबंधीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सोनालिका ट्रॅक्टर्स आपल्या संपूर्ण क्षमतेनिशी सरसावली आहे. भारताच्या सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेल्या ट्रॅक्टर ब्रॅण्डसपैकी एक असलेल्या आणि देशातील क्रमांक एकचा निर्यातदार ब्रॅण्ड अशी ओळख मिळविणा-या सोनालिका ट्रॅक्टर्सच्या शेतक-यांना केंद्रस्थानी ठेवणा-या, त्यांच्या विशिष्ट गरजांनुसार निर्माण केल्या जाणा-या ट्रॅक्टर्सच्या श्रेणीला यंदाच्या सणासुदीच्या मोसमात पुन्हा एकदा ग्राहकांचा सर्वोत्तम प्रतिसाद लाभला आहे, ही कंपनीसाठी मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे. सोनालिकाने आर्थिक वर्ष २२ मध्ये आजच्या तारखेपर्यंत एकूण ८५,०६८ ट्रॅक्टर्सची विक्री केली असून, ६.५६ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.
कंपनीची ही आजवरची सर्वोत्तम कामगिरी आहे. गेल्या वर्षी याच काळामध्ये कंपनीचे ७९,८२९ ट्रॅक्टर्स विकले गेले होते. देशातील शेतकरी शेतीच्या यांत्रिकीकरणासाठीच्या उपाययोजनांवर भर देत असताना, सोनालिकाने ऑक्टोबर २१ मध्ये एकूण १७,१३० ट्रॅक्टर्सची विक्री करून ५.५ टक्के वाढ नोंदवली आहे व उद्योगक्षेत्राच्या वाढीच्या दरालाही मागे टाकले आहे. शेतीच्या यांत्रिकीकरणाला पाठबळ देण्यासाठी आणि शेतक-यांना परवडू शकेल अशा पद्धतीने आणि शेतक-यांना परवडू शकेल अशा पद्धतीने त्यांना भरभराटीच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी सोनालिकाने बहुआयामी दृष्टीकोन अंगिकारला आहे.
यात उत्पादनामध्ये नाविन्यपूर्ण बदल करणे, वेगवेगळ्या राज्यांच्या विशिष्ट गरजांनुसार काम करणारे ट्रॅक्टर्स पुरविणे, आपली सेवा अधिकाधिक प्रमाणात ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नव्या श्रेणी आणि बाजारपेठा यांचा शोध घेणे – योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य दृष्टीकोन बाळगणे या सर्व गोष्टींमुळे आपल्या ग्राहकांना प्रगत शेती उपाययोजना पुरविण्याच्या कंपनीच्या प्रयत्नांना वेग मिळाला आहे. भारतीय उत्पादकांपैकी सोनालिका ही कंपनीच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर आपले वर्चस्व राखून आहे व या बाजारपेठेमध्ये तिचा हिस्सा २५ टक्के इतका आहे.
सोनालिका ट्रॅक्टर्सचे एक्झेक्युटिव्ह डायरेक्टर रमण मित्तल म्हणाले, की सणासुदीच्या काळातच शेतकरी आपल्याजवळील ट्रॅक्टर्सच्या बदल्यात, आपल्या शेतीच्या उत्पादकतेत तसेच उत्पन्नात वाढ करू शकेल अशाप्रकारे अधिक प्रगत ट्रॅक्टर घेण्यास तयार असतात. सोनालिकाच्या हेवी ड्युटी उत्पादनश्रेणीवर शेतक-यांनी ठेवलेल्या विश्वासाच्या जोरावरच कंपनीने आपल्या इथवरच्या अतुलनीय प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे, शेतक-यांच्या गरजांना मध्यवर्ती स्थान देण्याच्या सोनालिकाच्या अंगभूत कार्यपद्धतीनुसार आम्ही आर्थिक वर्ष शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा वाढणारा वापर व नेमक्या तंत्रानिशी शेती करण्याच्या पद्धती विकसित झाल्याने शेतीची उत्पादकता लक्षणीयरित्या वाढल्याने भारतीय ट्रॅक्टर्सच्या बाजारपेठेला मोठी चालना मिळत आहे.







Leave a Review