दिग्गज गायकांच्या गाण्यांना गुलाबी थंडीत रसिकांची उत्स्फूर्त दाद

Share this Newz

द न्यूज बिज् टीम, पिंपरी : पिंपळे गुरव येथे कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठान व माजी नगरसेवक राजेंद्र जगताप मित्र परिवाराच्या वतीने आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमात गायक अभिजित कोसंबी, लिटिल चॅम्प गायिका मुग्धा वैशंपायन, अश्विनी कुर्पे, आंतरराष्ट्रीय पार्श्वगायक राजू जाधव, मंगेश चव्हाण यांनी रसिकांना सकाळच्या प्रहरी गुलाबी थंडीत मंत्रमुग्ध केले. रसिकांनी उत्स्फूर्त दाद देत कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.

http://राजेंद्र जगताप यांनी राजकारणात खूप पुढे जावं : ज्येष्ठ अभिनेत्री आशाताई काळे https://thenewzbiz.com/?p=6492

पिंपळे गुरव येथील काटेपुरम चौक येथील कै. काळूराम जगताप बॅडमिंटन हॉल शेजारील मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आयोजक राजेंद्र जगताप, मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, माजी नगरसेवक राजू लोखंडे, अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे शहराध्यक्ष विजूआण्णा जगताप, माजी महापौर शकुंतला धराडे, नगरसेविका स्वाती काटे, संदीप राठोड, ह.भ.प. राघव चैतन्य महाराज, सुदाम ढोरे, मारुतराव साळुंके, ऍड. बाजीराव दळवी, ऍड. आशुतोष काशीकर, ऍड. प्रिया देशमुख, सूर्यकांत खेडकर, गायक किरण पवार, विश्वनाथ शिंदे, सामजिक कार्यकर्ते बापूसाहेब ढोरे, प्रकाश शितोळे, बळीराम जाधव, सुनील कदम, राजेंद्र कुंवर, रुपाली ढोकळे आदींसह भैरवनाथ जेष्ठ नागरिक संघ, संत गाडगेबाबा जेष्ठ नागरिक संघ, पितामह भिष्माचार्य जेष्ठ नागरिक संघ, आनंद जेष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी, पिंपळे गुरव, सुदर्शन नगर, नवी सांगवी, जुनी सांगवी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिवाळी पहाटची सुरुवात गणेशवंदनेने झाली. त्यानंतर अभिजितने सूर निरागस हो.. गीत गात वातावरण आणखी आल्हाददायक बनविले. मुग्धाने बोलावा विठ्ठल, अभिजितने प्रभू तू दयाळू, माझी विठाई माऊली, अश्विनी कुर्पे यांनी ऐरणीच्या देवा तुला हे गीत गात कार्यक्रमात रंगत आणली. मंगेश चव्हाण यांनी मन उधान वाऱ्याचे गीत गात टाळ्यांची दाद मिळविली. यानंतर अभिजित व श्रावणी यांनी मला वेड लागले प्रेमाचे हे युगुल गीत गात रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळविली. राधिकेचं कृष्णावर असलेलं प्रेम मुग्धाने मी राधिका.. मी प्रेमिका म्हणत रसिकांना मंत्रमुग्ध केले. अभिजितने सुख में सब साथी गात रसिकांच्या काळजाचा ठाव घेतला. अश्विनीने ही गुलाबी हवा वेड लावी जीवा या गाण्याने गुलाबी थंडीत रंग भरले. राधा ही बावरी गीत गात अभिजितने रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळविली. आले रे आले नगरसेवक राजेंद्र जगताप आले या मंगेश यांनी स्वरचित गीतातून जगताप यांच्या कार्याची महती गायली.
मुग्धाने गायलेल्या उगवली शुक्राची चांदणी लावणीवर रसिकांना ठेका धरायला भाग पाडले. याला टाळ्या व शिट्ट्यांची उत्स्फूर्त दाद मिळाली. ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांचे गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय, हे अभिजित व अश्विनी यांनी गायलेल्या गाण्याला रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. या गाण्याचे उत्स्फूर्त स्वागत केले. अभिजितने आई भवानी गोंधळाला ये गाण्यावर वातावरण भारावून टाकले.

Share this Newz