पिंपळे गुरवला उद्या डॉ. सुनील धनगर यांचे व्याख्यान

Share this Newz

द न्यूज बिज् टीम, पिंपरी : 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 226 व्या पुण्यतिथीनिमित्त अहिल्यादेवी सेवा संघ, सांगवी यांच्या वतीने उद्या (रविवारी) प्रसिद्ध वक्ते डॉक्टर सुनील धनगर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

पिंपळे गुरव येथील काटेपुरम चौकापासून हाकेच्या अंतरावरील खाडे बाबा मठासमोर असलेल्या घोडके कॉम्प्लेक्स येथे सकाळी साडेदहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार लक्ष्मण जगताप, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून महापौर उषा उर्फ माई ढोरे तसेच माजी नगरसेवक व उद्योजक शंकरशेठ जगताप हे उपस्थित राहणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष अजय दुधभाते यांनी दिली.

जाहिरात

Share this Newz