घोलप महाविद्यालयातील राष्ट्रीय सेनेच्या छात्रांचे देदीप्यमान यश

Share this Newz

द न्यूज बिज् टीम, पुणे :

विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देत त्यांना गुणवत्तापुर्ण व्यासपीठ उपलब्ध करुन देणाऱ्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सांगवी येथील बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्रांनी प्री आरडी कॅंम्प (प्रजासत्ताक दिन पुर्व संचलन) मध्ये देदीप्यमान यश मिळवले.

यामध्ये महाविद्यालयातील सिनिअर अंडर ऑफिसर शुभम दौंड याने कॅंम्प सीनियर व सांस्कृतिक या दोन्ही प्रकारांमध्ये सुवर्णपदक पटकाविले तर फायरिग प्रकारामध्ये रौप्य पदक मिळवले. त्याचबरोबर ज्युनिअर अंडर ऑफिसर लकी जोशी याने शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक प्राप्त केले तर व्हॉलीबॉल प्रकारामध्ये रौप्य पदकाची कमाई केली. या दोन्ही विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बटालियन राष्ट्रीय छात्र सेना पुण्याचे कमांडिंग ऑफिसर कर्नल जे. एस. बाली यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी दोन्ही विद्यार्थी तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी लेफ्ट. विठ्ठल नाईकवाडी यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
घोलप महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्रांनी मिळवलेल्या या देदीप्यमान यशाबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्रजी घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी महाविद्यालयाचे अभिनंदन केले.


Share this Newz