उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पिंपरीत आंदोलन

Share this Newz

द न्यूज बिज् टीम, पिंपरी : 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहिणी व मुलगा पार्थ पवारच्या कार्यालयात केंद्रीय आयकर विभाग सूडबुद्धीने छापे टाकत असल्याचा आरोप करीत पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसने आज पिंपरीत निषेध आंदोलन केले. तसेच केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.

पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले. या आंदोलनात आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी महापौर योगेश बहल, वैशाली घोडेकर, अपर्णा डोके, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, अजित गव्हाणे, विक्रांत लांडे, समीर मासुळकर, राजू बनसोडे, युवकचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे, नगरसेविका वैशाली काळभोर, निकिता कदम, पोर्णिमा सोनवणे, संगीता ताह्मणे, माजी नगरसेवक अतुल शितोळे, शिवाजी पाडुळे, काळूराम पवार, राजेंद्र साळुंखे, प्रसाद शेट्टी, प्रवक्ते फजल शेख, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, युवक कार्याध्यक्ष श्याम जगताप, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, उज्ज्वला ढोरे, युवा नेते तानाजी जवळकर, अमरसिंग आदियाल आदी कार्यकर्ते आंदोलन सहभागी झाले होते.

आंदोलकांनी ‘आम्ही सदैव अजितदादांसोबत’, ‘We support ajit dada’, ‘आमची ताकद, आमचा अभिमान अजितदादा’, असे फलक हातामध्ये घेतले होते. हाताला काळी फित बांधली होती.


Share this Newz