श्याम स्टील भारतातील रिटेल कामकाजाचा विस्तार करणार

Share this Newz

द न्यूज बिज् टाईम्स, पुणे : 

श्याम स्टील ही देशाच्या पूर्व, ईशान्य आणि उत्तर भागातील रिटेल बाजारपेठांमधील प्रसिद्ध कंपनी आणि भव्य पायाभूत सुविधा प्रकल्पांना टीएमटी बार्स पुरवणारी मोठी पुरवठादार आहे. कंपनीने ६००० वितरक व्यापारी व डीलर्सचे मोठे नेटवर्क प्रस्थापित केले असून आता कंपनी मध्य, पश्चिम आणि दक्षिण भागात ब्रँडचा विस्तार करणार आहे.कंपनी या राज्यातील प्रत्येक भागात आपले अस्तित्व निर्माण करणार आहे.

कंपनीने थर्ड- पार्टी लॉजिस्टिक्स सेवा पुरवठादारांचे अतिशय प्रभावी नेटवर्क तयार केले असून त्याद्वारे आपली उत्पादने सुरळीत आणि वक्तशीरपणे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणार आहे. कंपनीने यापैकी प्रत्येक राज्यात ५०० वितरक, व्यापारी आणि रिटेलर्सची टीम नेमण्याची व त्यातून गृह बांधणी क्षेत्रातील बिल्डर्सना आपला ब्रँड सहजपणे आणि वाजवी किंमतीत उपलब्ध करून देण्याची योजना आखली आहे.

श्याम स्टीलने स्टील विक्रीचे कमॉडिटी मॉडेलपासून ब्रँड मार्केटिंग मॉडेलमध्ये रुपांतर करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे. कंपनीच्या टीएमटी ब्रँडची ग्राहकांमध्ये चांगली ओळख तयार झाली आहे. कंपनीने ब्रँडिंगचे धोरण सायक्लिक कमॉडिटी, टीएमटीचे वर्षभर मागणी असलेल्या उत्पादनात रुपांतर केले आहे. यामुळे कंपनीला विक्रीची आकडेवारी लक्षणीय प्रमाणात उंचावण्यात मोठी मदत झाली आहे.

श्याम स्टीलचे संचालक श्री. सुकेत बेरीवाल म्हणाले की  ‘देशाच्या मध्य, पश्चिम आणि दक्षिण राज्यात प्रवेश करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. गृहबांधणी क्षेत्रातील बिल्डर्सना बहुतेक वेळेस दर्जेदार टीएमटी उपलब्ध होत नाहीत किंवा त्यांना त्यासाठी जास्त प्रीमियम भरावा लागतो. आम्ही बाजारपेठेत येण्याने ग्राहकांना उच्च दर्जाचा राष्ट्रीय टीएमटी ब्रँड त्यांच्या बजेटमध्ये मिळेल. सहा दशकांपेक्षा जास्त अनुभव आणि प्रतिष्ठेमुळे आम्हाला या राज्यांतील गृह बांधणी बिल्डर्सकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल असा ठाम विश्वास आहे.’

ब्रँडचे यश फ्लेक्सीस्ट्राँग टीएमटी रेबारच्या घटकामध्ये आहे, जे केवळ मजबूतच नाही, तर त्यात ताकद आणि लवचिकता यांचा योग्य समतोल साधण्यात आला आहे. कंपनीच्या उत्पादनांचा विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांसारख्या आपापल्या क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी प्रचार केला आहे. त्यांचे नाते टीएमटीच्या घटकांप्रमाणेच ताकद व लवचिकता यांचा योग्य समतोल दर्शवणारे आहे.


Share this Newz