डॉ. आदित्य पतकराव ठरले सर्वाधिक कर देणारे दंत चिकित्सक; ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’ने घेतली दखल

Share this Newz

द न्यूज बिज् टीम, पुणे

पुणे (नवी सांगवी, पिंपळे गुरव) येथील प्रख्यात दंत चिकित्सक डॉ. आदित्य पतकराव यांची जगात सर्वात जास्त टॅक्स भरणारे दातांचे डॉक्टर म्हणून लंडन येथील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत ही नोंद करण्यात आली आहे.

इंदौर येथे वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन यांच्या सदस्यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, बॉलीवुडचे सुप्रसिद्ध गायक उदित नारायण, गीतकार समीर अंजान, अखिलेश मिश्रा (हाय कमिशन रिपब्लिक ऑफ आयर्लंड), शंकर ललवाणी (खासदार इंदौर लोकसभा), अरविंद कापुर (मेजर जनरल, इंडियन आर्मी), संजय शुक्ल (चीफ सेक्रेटरी, म.प्र सरकार), वरून कपूर ( ए. डी. जी म.प्र पोलीस), यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही नोंद करण्यात आली आहे.

डॉ. आदित्य पतकराव यांनी दंत चिकित्सा आणि संशोधनामध्ये केलेल्या कामाबद्दल त्यांचा अनेक संस्थांनी गौरव केला आहे. आता डॉ. आदित्य पतकराव यांच्या दंत चिकित्सा कार्याची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली आहे. डॉ. आदित्य यांना या आधी अनेक नामांकित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. दंत चिकित्सेमध्ये सर्वाधिक कर देणारे दंत चिकित्सक म्हणून डॉ. आदित्य यांची लंडन येथे वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे.

या आधी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची लंडन येथील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली होती. त्याच बरोबर पद्मश्री सन्मानित १०८ वर्षीय सालुमरदा थिमक्का, डॉ. करोलिन मकाका आणि हदी हमद अल जरूर यांना पण या सन्मानाने सन्मानित करण्यात आलेले आहे. पिंपरी चिंचवड शहरासाठी दोन नांवाची वर्ल्ड रेकॉर्ड लंडन येथे नोंद झाल्या मुळे व डॉ. आदित्य हे अंबाजोगाईचे असल्यामुळे अंबाजोगाई शहराचे नाव देखील आंतरराष्ट्रीय पातळीवर लौकिक झाले.
यापूर्वीही डॉक्टर आदित्य यांना लंडन पार्लमेंटचा अत्यंत सन्मानाचा समजला जाणारा “जागतिक एक्स्लन्स पुरस्कार २०१९” हा पुरस्कार मेंबर अॉफ ब्रिटिश पार्लमेंट यांच्या हस्ते लंडन पार्लमेंट हाऊस प्रदान करण्यात आला होता. तसेच राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने देखील वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला होता.

डॉ. आदित्य पतकराव हे मूळचे अंबाजोगाई, बीड येथील रहिवासी असून औरंगाबाद येथील शासकीय दंत महाविद्यालयातुन त्यांनी बी.डीएस. ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी नवी सांगवी येथे “आदित्य डेंटल अँड इनप्लांट सेंटर”च्या माध्यमातुन दंतचिकित्सा आणि रुग्णसेवा सुरु केली. आपल्या या सेंटरमधुन डॉ.आदित्य हे जागतिक पातळीवरील सर्व आत्याधुनिक रुग्ण सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करत आहेत . दंतरोग चिकित्सा क्षेत्रात डॉ. आदित्य यांनी आपले ज्ञान आधिक अद्ययावत (अपग्रेड) करुन दंत रुग्णांना अत्याधुनिक रुग्णसेवा प्रभावीपणे पुरवली. एवढेच नव्हे तर दंत चिकित्सेमधील नवनवीन शोधप्रबंध तयार करून त्याचे जागतिक पातळीवरील विविध देशात आयोजित करण्यात आलेल्या दंत चिकित्सा परीषदेत वाचनही केलेले आहे.

डॉक्टर पतकराव हे उपभोक्ता उत्थान संघटनेचे शहराध्यक्ष म्हणूनदेखील कार्यरत असून नुकतीच त्यांची भटक्या विमुक्त जाती जमाती महासंघाच्या राष्ट्रीय युवक कार्याध्यक्षपदी नियुक्त करण्यात आली आहे. केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे तसेच महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी या निवडीबद्दल डॉक्टर आदित्य पतकराव यांचे अभिनंदन केले आहे.


Share this Newz