रस्त्याला काम पूर्ण होण्याच्या आधीच भेगा : गडकरींनी घेतली दखल

Share this Newz

द न्यूज बिज् टीम, परळी :

कामे केल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कामाचे सर्वचजण (विरोधकही) कौतुक करत असतात. त्यांनी पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे सह देशभर केलेल्या रस्त्यांच्या कामाचे कौतुक तर नेहमीच होते. मात्र, पैठण पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग 752 चे काम पूर्ण होण्याच्या आधीच भेगा पडल्या आहेत.

याबाबत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी या राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामासंदर्भात एक ट्वीट केले आहे. त्यानंतर नितीन गडकरी यांच्या कार्यालयाने तात्काळ याची दखल घेत संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्वीट करत म्हटले आहे की,
पैठण पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग 752 ला काम पूर्ण होण्याच्या आधीच भेगा पडल्या आहेत. माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जी यांना पत्र लिहीनच. त्यांनाही हे अजिबात चालणार नाही. तात्काळ दखल घेतली जाईल,” असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. सोबतच पंकजा मुंडे यांनी एक फोटो देखील पोस्ट केला आहे.

Office Of Nitin Gadkari
@OfficeOfNG
Union Minister Shri @nitin_gadkari ji directed concerned officials to take stern action against the contractor & all damaged panels shall be replaced at the earliest.

Share this Newz