The Newz Biz Team, PIMPRI
पिंपळे गुरवच्या साईनाथ नगरमधील श्री साईनाथ मित्र मंडळ (सुंदर ग्रुप)ने यंदा अयोद्धेतील श्रीराम मंदिराचा देखावा साकारला आहे. मंडळाचे संस्थापक, अध्यक्ष योगेश कदम (पाटील) आहेत.


सुरुवातीपासून मंडळ सामाजिक कार्यासाठी प्रसिध्द आहे. मंडळातर्फे वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. कोरोनामुळे उद्भवलेल्या कठीण काळातही मंडळातर्फे रक्तदान शिबिर, पोलीस बांधवांचा गौरव, नागरिकांना अन्नधान्य वाटप, मास्क-सॅनिटायझर वाटप, आरोग्य शिबिराचे आयोजन आदी विविध उपक्रम राबविण्यात आले.

कोरोना काळात केलेल्या कामगिरीची दखल घेत मंडळाला ‘कोविड योद्धा’ म्हणून गौरविण्यात आले. तसेच माता रमाई बहुउद्देशीय संस्थेतर्फे उत्कृष्ट मंडळ म्हणून सन्मानित करण्यात आले.







Leave a Review