The Newz Biz Team, PIMPRI
पिंपळे गुरव येथील अनंतनगर तरुण मित्र मंडळ दरवर्षी वैविध्यपूर्ण उपक्रम राबविणारे मंडळ म्हणून प्रसिध्द आहे. यंदा हे मंडळ 49 व्या वर्षात पदार्पण करीत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळाने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित न करता, महाराष्ट्र शासनाच्या कोरोनाविषयक निर्देशानुसार पर्यावरणपूरक फुलांच्या आकर्षक सजावटीमध्ये श्रींची प्रतिष्ठापना केली आहे. तसेच येथे दहा दिवस लोकांमध्ये कोरोना विषयी जनजागृती करण्याचा मंडळाचा मानस आहे. मंडळाचे अध्यक्ष निलेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे सर्व कार्यकर्त्यांनी यावर्षी गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे ठरविले आहे.








Leave a Review