जहांगीर हॉस्पिटलने लाँच केले नवे अत्याधुनिक एंडोस्कोपी केंद्र

Share this Newz

The Newz Biz Team, Pune

जहांगीर हॉस्पिटल या पुण्यातील अग्रगण्य वारसा हॉस्पिटलतर्फे नवे अत्याधुनिक एंडोस्कोपी केंद्र सुरू करण्यात आले आहे. गॅस्ट्रोइन्टेस्टिनल (जीआय) एंडोस्कोपीमध्ये अधिक चांगल्या इमेजिंग तंत्रज्ञानाच्या उदयामुळे आरोग्यसेवा क्षेत्रातील तंत्रज्ञानात झपाट्याने सुधारणा होत असताना जहांगीर हॉस्पिटलने आपली एंडोस्कोपी यंत्रणा अधिक चांगली करण्यासाठी पाऊल उचलले आहे. या निमित्ताने नव्या उपकरणांची भर घातली आहे आणि नव्याने सुरू केलेल्या अत्याधुनिक सेंटर फॉर एंडोस्कोपीसह आपले क्षेत्र व्यापक केले आहे.

अॅडव्हान्स्ड सेंटर फॉर एंडोस्कोपीमध्ये १९० सीरिज एंडोस्कोप्ससह आधुनिक एक्झेरा ३ व्हिडियो एंडोस्कोपी सिस्टिम आहे. या यंत्रणेमुळे ड्युअल फोकस, अधिक उजळ व जास्त कॉन्ट्रास्ट असलेली नॅरो बँड इमेजिंग आणि सुधारित इमेज क्वालिटी मिळते. या सुविधेमुळे बायोप्सी न करता जीआय कर्करोगाचे सुरुवातीच्या टप्प्यावर निदान करता येते आणि मोठ्या आतड्यातील व गॅस्ट्रिक पॉलिप्सचे वर्गीकरण करता येते. या यंत्रणेमुळे कर्करोगांचेही निदान सुरुवातीच्या टप्प्यावर करता येते. यात यंत्रणा व कौशल्ये वापरून सुरुवातीच्या टप्प्यावरील कर्करोग किंवा प्रिकॅन्सरस लीझन्स (कर्करोगाच्या पेशींसारख्या दिसणाऱ्या पेशी अवयवामधून संकलित करणे) शस्त्रक्रियेविना शोधता येतात. नव्या स्कोप्समध्ये इंटिग्रेटेड वॉटर जेट चॅनल आहे. त्यामुळे रक्तस्त्राव होणाऱ्या रुग्णांमध्ये किंवा गुंतागुंतीच्या उपचार शस्त्रक्रियांच्या वेळी एंडोस्कोपिस्टना हेमोस्टॅसिसचे स्पष्ट चित्र दिसते.

ईयूएस किंवा एंडोसोनोग्राफी हे नवे तंत्रज्ञान असून, ते प्रामुख्याने ३  संकेतांसाठी वापरले जाते :

  • सीटी किंवा एमआरआयसारख्या इमेजिंग पद्धतींच्या वेळी अत्यंत लहान लीझन्स समजत नाही, उदा. पित्ताशय नलिकेमध्ये २-३ मिमिचे खडे होणे किंवा ५ मिमीपेक्षा कमी व्यासाचे छोटे ट्युमर होणे.
  • या व्यतिरिक्त, पारंपरिक बायोप्सी न करता जीआय कर्करोगाच्या अचूक निदानासाठी ईयूएस गाइडेड फाइन नीडल अॅस्पिरेशनसाठी वापर करता येतो.
  • सध्या एंडोस्कोपिक ड्रेनेजेससाठी सामान्यपणे वापरण्यात येणारे ईयूएसच्या सहाय्याने केलेले बायलरी ड्रेनेज, ईयूएसच्या सहाय्याने केलेले पॅनक्रिअॅटिक स्यूडोसिस्ट ड्रेनेजेस यासारख्या नव्या इंटर्व्हेन्शनल ईयूएस गाइडेड शास्त्रक्रियांसाठी याचा वापर होतो आणि रुग्णांचा त्वचेखालील (पर्क्युटेनस) ड्रेनेजेस किंवा शस्त्रक्रियेपासून बचाव होतो.

ही सर्व भर घातल्यामुळे जहांगीर हॉस्पिटल हे शहरातील एक सर्वसमावेशक आधुनिक एंडोस्कोपी केंद्र झाले आहे. पचनमार्गाच्या आजारांवरील उपचारांमध्ये या केंद्राची स्पेशॅलिटी आहे. गॅस्ट्रोइन्टेस्टिनल मार्गाचे सर्वंकष मूल्यमापन आणि उपचारांसाठी सर्व प्रकारच्या एंडोस्कोपिक सेवा प्रदान करण्यात येतात. आमच्या एंडोस्कोपी केंद्रामध्ये निदान व उपचारासंबंधित एंडोस्कोपी शस्त्रक्रिया करण्यात येतात. यात अपर एंडोस्कोपी (ईजीडी), कोलोनोस्कोपी, थेरप्युटिक एंडोस्कोपी आणि एंडोस्कोपिक रेट्रोग्रेड कॉलांजिओपॅनक्रिएटोग्राफी (ईआरसीपी) यांचा समावेश आहे आणि लहान मुलांपासून प्रौढ वयोगटातील व्यक्तींना या सेवा प्रदान करण्यात येतात.

या नव्या केंद्राबद्दल जहांगीर हॉस्पिटलचे सीईओ श्री. विनोद सावंतवाडकर म्हणाले, “अत्याधुनिक उपचार शस्त्रक्रियांसाठी रुग्णांना किंवा उपकरणांना ऑपरेशन थिएटरमध्ये अनावश्यक नेणे टाळण्यासाठी एकाच ठिकाणी सर्व जीआय समस्या आणि इंटरव्हेन्शन्ससाठी एकछत्री उपाय उपलब्ध करून देत जागतिक दर्जाचा अनुभव रुग्णांना प्रदान करण्यासाठी हे केंद्र लाँच करण्यात आले आहे. रुग्णाला आराम मिळावा आणि सुविधा मिळावी यासाठी एंडोस्कोपी झाल्यानंतर एक निश्चित रिकव्हरी एरिया तयार करण्यात आला आहे. यामुळे एंडोस्कोपीच्या व ऑपरेशन थिएटरच्या वेळेचा अधिक चांगल्या प्रकारे वापर होतो. परिणामी, रुग्णाला अधिक चांगले समाधान लाभते आणि आमच्या डॉक्टरांना शस्त्रक्रिया करणे अधिक सुलभ जाते.


Share this Newz