The Newz Biz Team, PUNE
कै. शांताराम बाईत प्रतिष्ठानच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस सुवर्णा काळभोर, सचिन शिंगोटे, पत्रकार अमोल सहारे यांच्या हस्ते अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी महादेव रोकडे, प्रवीण इंगोले, रियाज शेख, चंद्रकांत सोनवणे, एसव्हीएस हायस्कूलचे अध्यक्ष फ्रान्सिस डेव्हिड यांचा शिक्षक गौरव पुरस्कार माजी राज्यमंत्री डॉ. मदन कोठुळे व कै. शांताराम बाईत प्रतिष्ठानचे अध्यक्ष रविंद्र बाईत यांच्या हस्ते प्रदान करून गौरवण्यात आले.
आज प्रत्येक शिक्षकांनी कोरोना काळामध्ये विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त चांगले शिक्षण कसे मिळेल, यासाठी मेहनत घेणे गरजेचे आहे. शिक्षक हा विद्यार्थ्यांचा पाया असतो आणि तो पाया जर भक्कम झाला, तरच तो विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात यश संपादन करू शकतो, असे डॉ. मदन कोठुळे यांनी सांगितले.
यावेळी अगरवाल समाजाचे अध्यक्ष दीपक आगरवाल, शार्दूल बाईत, रोहन शिंदे, शिवाजी गवारे, संजय चव्हाण, अक्षय कळसकर, अमित कुलकर्णी, राजेंद्र कांबळे, अभिजित भटवेरा आदी उपस्थित होते.







Leave a Review