डिशक्याव चित्रपटाला मनसे चित्रपट सेनेच्यावतीने शुभेच्छा..!

Share this Newz

The Newz Biz Team, PIMPRI

लाॅकडाऊननंतर प्रथमच पिंपरी चिंचवड शहरात मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सुरु झाले असून, डिशक्याव या चित्रपटाला मनसे चित्रपट सेनेच्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

मनसे चित्रपट सेनेच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त डिशक्याव चित्रपटाचे दिग्दर्शक प्रितम पाटील, तसेच कलाकारांचे मनसे चित्रपट सेना पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत चित्रपटासाठी पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी चित्रपट सेनेचे दत्ता घुले, शिवनाथ दिलपाक, तुकाराम शिंदे, प्रसाद खैरे, वैजनाथ ढोपरे आदी उपस्थित होते.

या चित्रपटामध्ये स्टार कास्ट प्रथमेश परब, सुरेश विश्वकर्मा, सिद्धार्थ झाडबुके, महेश घर्ग, संदीप पाठक आदी आहेत.


Share this Newz