न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ७५ वा स्वातंत्र्यदिन साधेपणाने साजरा

Share this Newz

The Newz Biz Team, PIMPRI

रहाटणी येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फौंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये कोवीड-१९ च्या प्रादुर्भावामुळे ७५ वा स्वातंत्र्यदिन अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. ध्वजारोहन निर्मला कुटे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच निर्मला कुटे यांच्या फौंडेशनच्या वतीने दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले.

यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, संस्थेचे सेक्रटरी संदीप चाबुकस्वार, मुख्याध्यापिका आसावरी घोडके, लायन क्लबचे अध्यक्ष अंजुम सय्यद, लायन्स क्लबचे सेक्रेटरी इंदू सूर्यवंशी, लायन क्लबचे चेअरमन रुपाली शुक्ला, संजय कुटे, पोलीस निरीक्षक सुरेश भालेराव, तात्या शिनगारे, सामाजिक कार्यकर्ते युवराज प्रगने, राजेश गायकवाड व इतर मान्यवर उपस्थित होते.

मुख्याध्यापिका घोडके यांच्या मार्गदशनाखाली ऑनलाईन टेकनॉलॉजिचा वापर करून १ ली ते १० वीच्या विद्यार्थ्यांसोबत ऑनलाईन स्वातंत्र्य दिवस साजरा केला. यावेळी सर्व शिक्षकांनी देशभक्ती गीत गाऊन स्वातंत्र्यदिन साजरा केला. यावेळी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यक्रमात उपस्थित होते. सूत्रसंचालन लीना इंगवले यांनी
तर आभार नववीची विद्याथी तनिष्का कांबळे हिने मानले.


Share this Newz