कचरावेचकांना कसलं आलंय स्वातंत्र्य ?  पोटासाठी धुंडताहेत कचराकुंड्या

Share this Newz

The Newz Biz Team, PIMPRI

आपण 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करताना आपण सर्वजन खूप आनंदी असतो, पण दुसऱ्या बाजूला पोटाची खळगी भरण्यासाठी पहाटेच्या चार वाजता उठून आपला उदरनिर्वाहासाठी चिमुकल्याची झोपमोड करून झोपेतच चारचाकी हातगाडीवर चिमुकल्याना बसवून कचराकुंडया जवळील व रस्त्यावरील  कचरा गोळा करताना चिमुकले दिसताय.यावेळी अनेक वेळा भटकी कुत्रे अंगावर ही येतात. या बालक मुलांना कसला स्वातंत्र्य दिन ?

पायात चप्पल नाही ,ना मास्क नाही. ही विदारकता पिंपळे गुरवमधील वैदू वस्तीतील दावीत, पाचगे कुटुंबाची आहे. पाचगे पती-पत्नी मुलासह भल्या पहाटे पिंपळे गुरव, वैदू वस्ती, नवी सांगवी परिसरात कचरा गोळा करताना दिसत आहेत. दावीत म्हणाले, की सध्या प्रभाग 31 कुडया मुक्त झाल्याने कचराही मिळत नाही. जिवन जगण्याच्या संघर्षात मुलांच्या आरोग्याचे व शिक्षणाचे काय? स्वतंत्र मिळुनही आजच्या अज्ञान बालकाचे हे कोवळे हात जबाबदार नागरिक कसे घडणार? गरीबीच्या कचाट्यातून त्यांना कसे बाहेर काढणार ?

मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड म्हणाले, की अनेक शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहचवल्या पाहिजेत. यासाठी शासनाने व राज्यकर्ते यांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणले पाहिजे.

Advertisment


Share this Newz