The Newz Biz Team, PUNE
सोमवारपासून पुणे शहरातील निर्बंध हटवण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार पुणे शहरातील सर्व दुकाने सर्व दिवशी दिवसभर सुरू राहणार आहेत. पुणे ग्रामीणमध्ये मात्र निर्बंध कायम राहणार आहेत.
निर्बंध उठवल्यामुळे शहरातील सर्व दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरु राहणार आहेत. तर हॉटेल रात्री १० पर्यंत सुरु ठेवता येणार आहेत. शनिवारी आणि रविवारी सर्व सेवांना दुपारी ४ पर्यंतच परवानगी असणार आहे. मॉल मात्र रात्री ८ पर्यंत सुरु ठेवता येणार असून, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश मिळणार आहे.







Leave a Review