प्रवेश प्रक्रियेसाठी प्रवेश परीक्षा (CET) होणार नाही , पण…

Share this Newz

 The Newz Biz Team, PUNE

परवाच बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यानंतर आता विद्यार्थ्यांची पुढील शिक्षणासाठी प्रवेशासाठी कागदपत्रे जमवाजमव करायला सुरुवात झाली आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी प्रवेश परीक्षा (CET) होणार, की थेट प्रवेश मिळणार, याबाबत शासनाने भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानुसार यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवेश परीक्षा घेण्यात येणार नाही, असे राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, व्यावसायिक (प्रोफेशनल) कोर्सेसमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी CET परीक्षा द्यावीच लागणार आहे.

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायन्स (Science), कॉमर्स (Commerce) आणि आर्ट्स (Arts) या शाखांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी CET परीक्षा घेण्यात होणार नाही. परंतु व्यावसायिक, मॅनेजमेंट आणि लॉ या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य ठरणार आहे.

बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, बी एड (B.Ed.), एम बी ए (MBA), एम सी एम (MCM), आर्किटेक्चर (B.Arch.), लॉ (LLB) या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना CET म्हणजेच प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहे.

कधीपासून सुरु होणार CET

प्रोफेशनल कोर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 26 ऑगस्टपासून 2021 पासून CET परीक्षा सुरु होणार आहे आणि यासंबंधीचा टाइम टेबल लवकरच जाहीर केला जाईल, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.  तसेच व्यावसायिक आणि तांत्रिक अभ्यासक्रमांसाठी CET दोन सत्रात घेतली जाणार आहे. पहिले सत्र 4  सप्टेंबरपासून सुरु होणार आहे, तर दुसरे सत्र 14 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे.

महाविद्यालये होणार सुरु

सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालला आहे. त्यामुळे कोविडची स्थिती बघून पुढचं शैक्षणिक वर्ष फिजीकली सुरू करणार अशी घोषणा उदय सामंत यांनी केली आहे. हे शैक्षणिक वर्ष कधी पासून सुरु होणार आणि महाविद्यालये पुन्हा कधीपासून सुरु होणार याबद्दलचा निर्णय येत्या 8 दिवसात घेणार असल्याचंही त्यांनी म्हंटलं आहे. प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळी परिस्थिती आहे, त्यामुळे प्रत्यक्ष कॉलेज सुरू होताना निकष वेगळे असतील असेही उदय सामंत यांनी सांगितले.


Share this Newz