The Newz Biz Team, PIMPRI
पिंपरी चिंचवड शहर क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने टोकियो ऑलिम्पिकच्या निमित्ताने खेळाडूंना शुभेच्छापर “गाथा महाराष्ट्राच्या ऑलिम्पिक वीरांची “या कार्यक्रमाचे आयोजन ज्ञान प्रबोधिनी निगडी येथील मनोहर वाढोकर सभागृहात करण्यात आले होते.
यावेळी बाळकृष्ण अकोटकर आणि मारुती आडकर या माजी ऑलिम्पिक खेळाडूंचे सत्कार केंद्रप्रमुख मनोज देवळेकर व शहर अध्यक्ष अंगदराव गरड यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महासंघांचे राज्य अध्यक्ष शरदचंद्र धारूरकर, मिलिंद क्षीरसागर, चांगदेव पिंगळे, कविता आल्हाट, भगवानराव सोनवणे, शेखर कुलकर्णी, अनिल नाईकरे, सत्यवान वाघमोडे, राजेंद्र महाजन, रामेश्वर हराळे, लक्ष्मण माने, साहेबराव जाधव, जीवन सोळुंके आदी पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक अंगदराव गरड, तर आभार सचिव सत्यवान वाघमोडे यांनी व्यक्त केले.







Leave a Review