The Newz Biz Team, PUNE
पुण्यातील सर्वोत्कृष्ट तसेच प्रतिष्ठित विकासक, गोल गंगा डेव्हल्पमेंट्सने नुकताच १२५ कोटी रुपयांचा विकास व्यवस्थापन करार केला आहे. या व्यवस्थेच्या अंतर्गत, गोयल गंगा डेव्हल्पमेंट्स पुण्यातील विविध अत्याधुनिक निवासी प्रकल्पांच्या ऑपरेशनमध्ये गुंतवणूक करतील.
आपला विकास व्यवस्थापन पोर्टफोलिओ वाढवत, विकासकाची चालू आर्थिक वर्षाच्या आगामी तिमाहीत आणखी २०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांसाठी भागीदारी करण्याची योजना आहे. विविध प्रकल्पांच्या बांधकामाच्या ऑपरेशन्समध्ये गोयल गंगा डेव्हल्पमेंट्सचा गुंतवणूक योगविले (धायरी), मेन्लो (हिंजवाडी), ९ विलाज ( एनआयबीएम) आणि क्लीव्हलँड पार्क ( एनआयबीएम) करण्याचा विचार आहे.
गोयल गंगा डेव्हल्पमेंट्स या सर्व प्रकल्पांची विक्री हाताळणार असून त्यातल्या काही प्रकल्पानचा विकासही करणार आहे. त्यांचे प्रतिष्ठित भागीदार वर्धन लाइफस्टाइल्स, रॉयल ग्रुप आणि बालाजी हौसिंग कंपनीसाठी गोयल गंगा डेव्हल्पमेंट्स ब्रँडनेम अंतर्गत असे केले जाणार आहे.
गोयल गंगा डेव्हल्पमेंट्स हे नाव जागतिक दर्जा आणि प्रकल्पांच्या नियोजित वेळेवर पूर्तीशी समानार्थी शब्द बनले आहे. हे विकास व्यवस्थापन करार, जिजीडीला परिपूर्ण प्रकल्प आखणीमध्ये सर्वोत्तम गुणवत्ता आणि विक्रीच्या वेगामुले एक आघाडीची कंपनी म्हणून स्थान बळकट करण्यात यशस्वी ठरणार आहे.
या सहयोगाबद्दल बोलताना, गोयल गंगा डेव्हलपमेंट्सचे संचालक अंकित गोयल, म्हणाले, प्रत्येक प्रकल्पातील उत्कृष्टतेचा पाठपुरावा करून एखाद्या व्यक्तीचे आयुष्य पूर्णत्वाकडे नेणारी घरे पुरवणे, हीच गोयल गंगा डेव्हलपमेंट्सची मोहिम आहे. ग्राहकांसाठी घर खरेदीचा अनुभव सुधारण्याचा एक उद्देश मनात ठेवून काम करत असताना आमचा विश्वास आहे कि, आमच्या भागीदारांसह केलेले विकास व्यवस्थापन करार दोहोंसाठी फायदेशीर ठरतील तसेच अंतिम वापरकर्त्यांना त्यांच्या स्वप्नातील घरे, परवडणाऱ्या किंमतीत मिळतील.







Leave a Review