सांगली-मिरज-कुपवाड शहराच्या मदतकार्यासाठी पिं. चिं. महापालिकेचे पथक रवाना – महापौर उषा उर्फ माई ढोरे

Share this Newz

The Newz Biz Team, PIMPRI

सांगली पूरग्रस्तांच्या मदतकार्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी व स्वंयसेवकांचे पथक आज (दि. २७ जुलै) सायंकाळी सांगलीकडे रवाना झाले. याबाबतची माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिली.

पश्चिम महाराष्ट्रातील सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळून झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर आल्याने नागरी वस्तीत व नगरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने जनजीवन पूर्णत : विस्कळीत झाले आहे. तसेच सांगली जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पूरस्थिती निर्माण होवून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सद्यस्थितीत पूरस्थिती ओसरली असून, तेथील उपाययोजना व मदतकार्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी व स्वंयसेवकांचे पथक आज (दि. २७ जुलै) सायंकाळी सांगलीकडे रवाना झाले आहे.

सांगली-मिरज-कुपवाड शहर महापालिका क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शहर व जिल्ह्यास पूरपरिस्थितीचा सामना करावा लागत आहे. पाणी ओसरत जाईल, त्याप्रमाणे महापालिकेमार्फत शहराची स्वच्छता व आरोग्य विषयक उपाययोजना करण्यास सुरवात झालेली आहे. सदर परिस्थितीवर उपाययोजना व मदतकार्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली विविध संयंत्रे व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे . या पथकामध्ये ०४ अधिकारी , ७० कर्मचारी तसेच अंदाजे ३० स्वयंसेवक यांचा समावेश असून, सदर पथक साहित्य व उपकरणासहित मदतकार्यासाठी सांगलीकडे रवाना झाले, असेही महापौर ढोरे यांनी सांगितले.


Share this Newz