दहावीच्या परीक्षेत ऑल सेट्स हायस्कूलचा निकाल 100%

Share this Newz

The Newz Biz Team, PUNE

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत ऑल सेट्स हाय स्कूल या शाळेचा निकाल 100% लागला. यावर्षी मंडळाला व शाळेला निकाल जाहीर करण्यात खूप अडचणी निर्माण झाल्या होत्या या सर्व अडचणीवरही मात करत मंडळांनी दहावीचा निकाल जाहीर करत उत्कृष्ट कामगिरी केली.

शाळेमध्ये प्रथम क्रमांक तेजस कांबळे 87.80%, दुसरा क्रमांक गायत्री गई 86.80% तर तृतीय क्रमांक कणाद तांबहेकर 86.40% यांनी यश संपादन केले. या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार शाळेत शाळेच्या मुख्याध्यापिका जस्सी जयसिंग, मुख्याध्यापक जस्सूराज अय्यदुराई, तर डायरेक्टर जयसिंग .डी. यांच्या हस्ते करण्यात आला व त्यांच्या पुढील शिक्षणाच्या वाटचालीकरता शुभेच्छा देण्यात आल्या, अशी माहिती शाळेचे क्रीडाशिक्षक सुनील साठे यांनी दिली .


Share this Newz