The Newz Biz Team, PUNE
ओला इलेक्ट्रिक स्कूटरसाठी पहिल्या २४ तासांतच विक्रमी १ लाख नोंदणी झाल्याचे ओलाने आज जाहीर केले. त्यामुळे ओला इलेक्ट्रिक स्कूटर ही जगातील सर्वाधिक मोठ्या प्रमाणात पूर्वनोंदणी झालेले वाहन ठरले आहे.
ओला इलेक्ट्रिक स्कूटरने १५ जुलैच्या संध्याकाळपासून नोंदणीला सुरुवात केली. क्रांतिकारी ओला स्कूटरसाठी olaelectric.com यावरून ४९९ रुपयांना नोंदणी करता येऊ शकते. या योजनेला ग्राहकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. ग्राहक सातत्याने वेबसाईटला भेट देत होते. यामुळे विक्रमी संख्येत स्कूटरची नोंदणी झाली.
ओलाचे अध्यक्ष आणि समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाविश अगरवाल म्हणाले, “आमच्या पहिल्या इलेक्ट्रिक वाहनासाठी देशभरातल्या ग्राहकांकडून मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद बघून मी भारावून गेलो आहे. इलेक्ट्रिक वाहनांकडे ग्राहकांचा वाढत असलेला कलच या प्रचंड मागणीतून दिसून येत आहे. शाश्वत दळणवळणाच्या दिशेने जगाला नेण्याच्या आमच्या ध्येयाच्या बाजूने टाकलेले हे एक मोठे पाऊल आहे. ज्यांनी ज्यांनी ओला स्कूटर साठी नोंदणी केली आणि जे या इलेक्ट्रिक वाहनांच्या क्रांतीत सहभागी झाले त्या सर्वांचा मी ऋणी आहे. ही तर फक्त सुरुवात आहे !”
योग्य वेग, अभूतपूर्व रेंज, सर्वाधिक बूट स्पेस आणि जोडीला प्रगत तंत्रज्ञान यांसह ओला स्कूटर क्रांतिकारी अनुभव देईल आणि ग्राहक विकत घेऊ शकतील अशी सर्वोत्तम स्कूटर असेल. व्यापक पातळीवर सर्वांना उपलब्ध होऊ शकेल अशी त्याची किंमत असेल. आगामी काही दिवसांत ओला आपल्या स्कूटरची वैशिष्ट्ये आणि किंमत जाहीर करेल.
साऱ्या जगासाठी ओला स्कूटरची निर्मिती भारतात होईल. भारतातील तमिळनाडू येथील जगातल्या सर्वात मोठ्या, सर्वात आधुनिक आणि शाश्वत दुचाकी वाहनांच्या ओला फ्युचर फॅक्टरी येथे हे उत्पादन होणार आहे. ओला फ्युचर फॅक्टरीची पहिली पातळी लवकरच पूर्ण होत असून लगोलग येथे कामकाजाला सुरुवात होईल. त्यापुढच्या वर्षी १० दशलक्ष वार्षिक क्षमतेने वाहनांची निर्मिती होणार आहे.








Leave a Review