The Newz Biz Team, PIMPRI
पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कूलचे संस्थापक संदीप विठ्ठलराव काटे यांची महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनच्या (मेस्टा)पुणे,पिंपरी चिंचवड शहर जिल्हाअध्यक्षपदी सर्वानुमते नुकतीच नियुक्ती करण्यात आली.
संदीप काटे यांचे शैक्षणिक,तसेच सामाजिक क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन हेच कार्य आधिक व्यापक स्वरुपात करण्याची संधी मिळावी या हेतुने ही नियुक्ती करण्यात आली आहे.‘मेस्टा’चे संस्थापक अध्यक्ष संजयराव तायडे-पाटील यांनी नुकतेच संदीप काटे यांना सदर निवडीबाबतचे पत्र देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, संदीप काटे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर पिंपरी चिंचवड शहर व संपूर्ण पुणे जिल्हातील इंग्रजी शाळा संस्थाचालकांकडून या निवडीचे स्वागत करण्यात आले.
राज्यातील इंग्रजी शाळांची शक्तिशाली संघटना म्हणून नावारूपास आलेल्या या संघटनेच्या माध्यमातून संस्थापक संजयराव तायडे – पाटील यांच्यासह संघटनेच्या अन्य पदाधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या तसेच संस्था चालकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आवाज उठविला जाईल.
‘मेस्टा’ संघटनेने माझी जिल्हा अध्यक्षपदी केलेली ही निवड सार्थ ठरवून सोपविलेली जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडण्याचा प्रयत्न राहील. शहरातील सर्व इंग्रजी माध्यमांच्या शाळा चालविणार्या संस्थापकांशी संवाद साधून न्याय हक्कासाठी एकजुटीने काम करणार आहे.
– संदीप काटे







Leave a Review