राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त अभिवादन

Share this Newz

The Newz Biz Team, PIMPRI

राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्विकुत नगरसेवक अनिकेत काटे यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

आरक्षण देणारा पहिला राजा, जे पालक आपल्या मुलांना शाळेत घालणार नाहीत त्यांना एक रूपया दंड ठोठावणारा राजा, अंधश्रद्धा, कर्मकांड दैववाद, यावर प्रहार करणारा राजा, सर्व क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविणारा राजा अशा शब्दांत अनिकेत दादा काटे यांनी विचार मांडले. यावेळी आषिश काटे, सुमित लुणावत, नितीन बोधे, अमित काकडे, जयवंत मोरे , सुभाष शहा, विलास वायकुळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार रविंद्र बाईत यांनी मानले.


Share this Newz