पुण्यातील ८६ टक्के गेमर्स मोबाईलवर खेळतात ऑनलाइन गेम्स

Share this Newz

The Newz Biz Team, PUNE

ऑल इंडिया गेमिंग फेडरेशन (एआयजीएफ) या भारतातील ऑनलाइन गेमिंग क्षेत्रातील ना- नफा तत्वावर काम करणाऱ्या संघटनेने ऑनलाइन गेमिंग इज अ लाइफस्कील हा अहवाल लाँच केला आहे.

या अहवालात गेमर्सद्वारे जीवनकौशल्ये समजली जाणारी कौशल्ये समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्याचबरोबर गेमर्स कशाप्रकारे ही कौशल्ये आत्मसात करतात, कामाच्या ठिकाणी अशी कौशल्ये आत्मसात करण्यासाठी त्यांना मदत झाली का ? आणि यापैकी कोणती कौशल्ये गेमिंगच्या माध्यमातून आत्मसात केली जाऊ शकतात हे मांडण्यात आले आहे. या अहवालानुसार पुण्यातील ८६ टक्के गेमर्स मोबाइल फोन्सवर ऑनलाइन गेम्स खेळतात. त्याशिवाय शहरातील ५६ टक्के गेमर्सनी ऑनलाइन गेम्समध्ये सातत्याने खेळ जिंकण्यासाठीचा सर्वोत्तम मार्ग शोधावा लागत असल्यामुळे विश्लेषणात्मक क्षमता विकसित होण्यास मदत झाली आहे.

अहवालानुसार एकंदरीत ७६  टक्के गेमर्सच्या मते जिंकण्याचा सर्वोत्तम मार्ग सतत शोधावा लागत असल्यामुळे विश्लेषणात्मक कौशल्ये विकसित होतात. त्यांच्यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त जणांना (५७ टक्के) असे वाटते, की कामाच्या ठिकाणी दिवसभर राहिल्यानंतर विकसित होणाऱ्या कौशल्यांप्रमाणेच ऑनलाइन गेम्स खेळताना एखादया व्यक्तीला आवश्यक कौशल्ये विकसित करता येतात – ५७ टक्के पुरुष आणि ५६ टक्के स्त्रिया या बाबीशी सहमत आहेत.

ऑनलाइन गेमर्सच्या मते गेमिंगसाठी आवश्यक असणारी आवश्यक जीवनकौशल्येही या अहवालात मांडण्यात आली आहेत. त्यात प्रतिक्षिप्त क्रिया (६५ टक्के), लॉजिक (६८ टक्के) या सर्वात महत्त्वाच्या दोन कौशल्यांचा समावेश असून, त्याशिवाय निश्चय (५३ टक्के), जोखीम / परताव्यांचे आकलन (५२ टक्के), आणि ४६ टक्के गेमर्सच्या मते उत्तम स्मरणशक्ती ही कौशल्ये महत्त्वाची आहेत. पुण्यातील ५३ टक्के गेमर्सनी अशा प्रकारची व्यावहारिक, जीवन कौशल्ये ऑफिसमध्ये एक पूर्ण दिवस व्यतीत करून शिकता येतात असे मत नोंदवले.

विशेष म्हणजे, गेमर्सचा प्रत्यक्ष आयुष्य – कामाच्या ठिकाणच्या नात्यापेक्षा ऑनलाइन गेमिंग क्षेत्रातील सहकाऱ्यांप्रती असलेला दृष्टीकोन जास्त सहज अनुकूल असतो असे दिसून आले आहे. ५६ टक्के गेमर्सच्या मते त्यांना आपल्या कामाच्या ठिकाणाच्या सहकाऱ्यांच्या तुलनेत (५१ टक्के) गेमिंग सहकाऱ्यांबरोबर जास्त प्रामाणिक राहायला आवडते. जेन झेडच्या (५ टक्के) तुलनेत ४५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांमध्ये (२ टक्के) हा फरक जास्त दिसून आला. नॉर्टनने केलेल्या अहवालातही हेच दिसून आले होते. या अहवालानुसार सहभागींपैकी ८१ टक्के जणांनी ऑनलाइन मल्टीप्लेयर गेम्समुळे त्यांची संघभावना सुधारल्याचे मत नोंदवले, तर ७१ टक्के जणांनी गेमिंगमुळे आकलन कौशल्य सुधारल्याचे सांगितले.

चारमधील एका गेमरला ऑनलाइन गेमिंग हा व्यवहार्य व्यवसाय वाटतो आणि हे या व्यवसायात आलेल्या बदलाचे प्रतीक म्हणता येईल. गेल्या वर्षी झालेला लॉकडाउन व सोशल डिस्टन्सिंगमुळे गेमिंगच्या छंदाचे पूर्ण वेळ करियरमध्ये रुपांतर करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. आज ईस्पोर्ट्स कंपनीबरोबर करार करणाऱ्या व्यावसायिक गेमरला महिना ५००० ते ४५,००० रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवता येते. लोकप्रिय मोबाइल गेम २०१९ भारतीय मालिकेत प्रादेशिक अंतिम फेरीतील टीमने ५,५०,००० रुपयांचे बक्षिस जिंकले होते.

या निरीक्षणांविषयी ऑल इंडिया गेमिंग फेडरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोलंड लँडर्स म्हणाले, निर्णायक विचारशक्ती, सर्जनशील विचारशक्ती, निर्णय क्षमता आणि समस्या निराकरण ही सर्व कौशल्ये प्रत्येकाच्या आयुष्यात विकासासाठी महत्त्वाची असतात. या संशोधनाच्या मदतीने आम्ही ग्राहकांना मोबाइल गेमिंगचे मूल्य खरंच समजले आहे का हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या अभ्यास अहवालामुळे आम्हाला गेमिंग हे लोकांना एकत्र येण्यासाठी, संवाद साधण्यासाठी व करियर उभारण्यासाठी उत्तम क्षेत्र असल्याचे लक्षात आले.

आगरकर सेंटर ऑफ एक्सलन्सच्या (एसीईसंस्थापक फातेमा आगरकर म्हणाल्या, ‘शिक्षण- मनोरंजनाचा हा प्रकार विकसित होईल तसा गेमिंग हा स्मृती, विश्लेषणात्मक क्षमता, एकाग्रता आणि आकलनविषयक इतर कौशल्यांचा स्त्रोत बनेल. किंबहुना शिक्षण क्षेत्रात गेमिंगचा वापर अध्यायांचे नियोजन करण्यासाठी तसेच विश्लेषणासाठी केला जात आहे. याला महत्त्व प्राप्त होत असतानाच वेगवान प्रतिक्रिया देण्यासाठी आकलन, विश्लेषणात्मक कौशल्ये अधिक वेगवान करणे, कारणमीमांसा कौशल्य उंचावणे या गोष्टी शक्य होत असतानाच गेमर्स सेकंदापेक्षाही कमी अवधीत निर्णय घेत असल्यामुळे समस्या निराकरणासाठी जास्त चांगल्या प्रकारे सक्षम होतात असे दिसून आले आहे.’

या अहवालाच्या मते ५१ टक्के स्त्रियांना प्रतिक्षिप्त क्रिया आणि स्मृती सारखे शारीरिक व मानसिक कौशल्ये ऑनलाइन गेमर्ससाठी जास्त महत्त्वाची (३३ टक्के पुरुषांच्या तुलनेत) असतात. दोन- तृतीयांशपेक्षा जास्त पुरुषांना (६७ टक्के) धोरण, लॉजिक, जोखीम व परताव्यांचे आकलन, निश्चय ही कौशल्ये ऑनलाइन गेमर्ससाठी जास्त महत्त्वाची (४९ टक्के स्त्रियांच्या तुलनेत) वाटतात.


Share this Newz