The Newz Biz Team, PUNE
प्रत्येक उद्योजकाने व्यवसायवृद्धीसाठी ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करणे हि काळाची गरज बनली आहे. याच मार्गाने भारतातील उद्योगधंदे ऑनलाइन पद्धतीने व्यवहार करू लागले तर कितीही छोटा उद्योजक असला तरी त्याला जागतिक स्तरावर ग्राहक मिळणे सहज शक्य होणार आहे. याच संकल्पनेतून उद्योग मित्र संस्था, नाशिक आणि अब्लिफ्री बिझनेस नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने आणि येस बँकेच्या सहकार्याने सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योजक, घरगुती उत्पादन असणारे व्यावसायिक, बचत गट, किरकोळ विक्रेते यांच्यासाठी डिजिटल एमएसएमई शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यांचे उद्घाटन भारत सरकारच्या राष्ट्रीय एमएसएमई मंडळाचे सदस्य प्रदीप पेशकर यांच्या हस्ते एका वेबिनार मध्ये झाले. यावेळी येस बँकेचे उपाध्यक्ष आणि एमएसएमई व्यवसायाचे प्रादेशिक प्रमुख विवेक सम्मनवार ,येस बँकेचे उपाध्यक्ष आणि नॉलेज बँकिंग चे प्रमुख अविनाश चंद्र आणि एब्लिफ्री बिझनेस नेटवर्क चे संचालक गोविंद सदामते उपस्थित होते.
उदघाटन प्रसंगी पेशकर म्हणाले प्रत्येकच व्यवसायाच्या विस्तारासाठी ऑनलाइन उपस्थिती महत्वाची असते. उद्योग मित्र आणि एबीएन हे एकत्रित प्रयत्नाने एमएसएमई व्यवसायांना डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देऊ शकतील असा आम्हाला विश्वास आहे.
येस बँकेचे उपाध्यक्ष आणि नॉलेज बँकिंगचे प्रमुख अविनाश चंद्र म्हणाले, की सर्वसामान्य उद्योजकांना त्यांच्या उत्पादन किंवा सेवांसाठी जर डिजिटल मंच उपलब्ध करून दिला तर त्यांच्या व्यवसायाला चालना मिळेल. डिजिटल व्यवहारांची क्षमता भारतीय एमएसएमई साठी एक प्राथमिक गरज आहे आणि ही क्षमता मिळवल्यास भारतीय उद्योगांना प्रगतीसाठी कसलीही मर्यादा राहणार नाही.
एमएसएमई डिजिटल मोहिमेचे महत्व विषद करताना एब्लिफ्री बिझनेस नेटवर्क चे संचालक गोविंद सदामते म्हणाले की मोफत वेबसाइट तयार करून मिळणे आणि इ-कॉमर्स व्यासपीठावरील उपस्थिती ही या व्यवसायांसाठी एक सुवर्णसंधी आहे.यामुळे त्यांच्या व्यवसायाची वाढ कसल्याही परिस्थितीत खंडित होणार नाही. प्रत्येक उद्योगाने या संधीचा लाभ घेतला पाहिजे.”
सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसाठीच्या (एमएसएमई) या महत्त्वाकांक्षी मोहिमेत या दोन संस्थांनी येस बॅंकेच्या सहकार्याने अशा उद्योगांना ऑनलाइन व्यवहारांसाठी आवश्यक सामग्री सिद्ध केली आहे. तसेच बँके तर्फे स्टार्टअप तसेच सुक्ष्म,लघु व मध्यम उद्योगांना विविध योजनेतून करण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याची माहिती देण्यात येणार आहे. येस एमएसएमइ या योजनेतून पात्र उद्योगांना अर्थसहाय्य सुध्दा देण्यासाठी उद्योग मित्र संस्था शिफारस करणार आहे. या मोहिमेत सहभागी होणा -या सर्व एमएसएमई संस्थांना त्यांचा ऑनलाइन व्यवहारांचा प्रवास सुरु करून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर नेता यावा हे या प्रयत्ना मागील उद्दिष्ट आहे.
या योजनेची सुरुवात २९ मे पासून सुरू झाली असून अवघ्या दोन दिवसात ५०० हून जास्त एमएसएमई व्यवसायांनी नोंदणी केली आहे. या कॅम्पमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक व्यावसायिकांनी आपले नाव, दूरध्वनी क्रमांक, ईमेल इत्यादी गोष्टींच्या तपशीलासह आपली माहिती ८३७८९७६२७२ / ९३२२ ४२ ९८३१ या व्हाटसअॅप नंबरवर अथवा udyog.abn@gmail .Com या ईमेल वर येत्या ३१ जून २०२१ पाठवून एमएसएमई कॅम्प मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.







Leave a Review