The Newz Biz Team, PUNE
खाजगी रुग्णालयात भरमसाठ बिले आकारणी केली जात आहे. त्यामुळे सामान्य नागरीक, हातावर पोट असणारे नागरीक हवालदिल झाले आहेत. याबाबत खाजगी रुग्णालयांचे ऑडीट झाले पाहिजे आणि त्यांच्यावर नियमानुसार कारवाई झाली पाहिजे. जेणेकरुन नागरीकांना दिलासा मिळेल, अशी विनंती महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना केली.
पुणे विभागीय आयुक्त कार्यालय येथे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत केलेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी खासदार, आमदार, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते राजु मिसाळ, आयुक्त राजेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
महापौर माई ढोरे म्हणाल्या, काही खाजगी रुग्णांलयांत दाखल होणा-या रुग्णांच्या नातेवाईकांकडून भरमसाठ बिले भरणेबाबत पाठपुरावा करण्यात येतो याबाबत लोकप्रतिनिधींकडे तक्रारी येत त्यामुळे अशा खाजगी रुग्णालयांवर कारवाई झाली पाहिजे यासाठी उपाययोजना करण्यात यावी असे सांगुन कोरोना तिस-या संभाव्य लाटेच्या अनुषंगाने तसेच म्युकर मायकोसिस रोगाबाबतीत योग्य त्या उपाययोजना करण्यात यावी अशी विनंतीही महापौर माई ढोरे यांनी केली.







Leave a Review