कंदरमध्ये सुरक्षारक्षक पथक दाखल

Share this Newz

The Newz Biz Team, पांडुरंग भगत

सध्या संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कंदर ता.करमाळा येथे ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता भरणे, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या करमाळा तालुका दौऱ्याप्रसंगी तालुक्याचे प्रवेशद्वार असलेल्या कंदर येथे कोविड १९ पथक सतर्क करण्यात आले आहे. कंदरमधील मुख्य चौकात पथक सतर्क असल्याने येणाऱ्या अत्यावश्यक कामासाठी व्यक्तीची विचारणा केली जात आहे.

कंदर हे पंचक्रोशीतील महत्त्वाचे ठीकाण आहे. आसपासच्या बिटरगाव, सांगवी, कविटगाव, सातोली, कन्हेरगाव, वडशिवणे आदी गावातील लोक कंदरमध्ये कामानिमित्त येत असतात. गर्दी होऊ नये व कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी सुरक्षा रक्षकाची नेमणूक केली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल हरे यांनी कमांडो देण्यात मदत केली. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कंदरमध्ये मुख्य चौखात “मनमे है विश्वास कमांडो फोर्स ” या सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे.

कंदरमध्ये लवकरच कोविड सेंटरची उभारणी करण्यात येणार आहे. १ मे पर्यंत जनता कर्प्यु असल्याने लोकांनी घराबाहेर फिरू नये,व सर्वांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन सरपंच प्रतिनिधी भास्कराव भांगे यांनी केले आहे.


Share this Newz