कंदरमध्ये १६२ जणांची कोविड टेस्ट व लसीकरण

Share this Newz

The Newz Biz, पांडुरंग भगत

कोविड टेस्ट व लसीकरण कँम्पचे कंदर ता. करमाळा येथे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी दिवसभरात १६२ लोकांनी कोविड टेस्ट करून कोवि सिल्डची लस घेतली. लस घेण्यापूर्वी कंदरमधील नागरीकांनी ऑनलाईन लसीकरण नोंदणी केली होती.

कंदरमध्ये लसीकरण कँम्पची मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच प्रतिनिधी भास्करराव भांगे यांनी केली होती. लसीकरणाला कंदर ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला. कोव्हीड १९ टेस्टिंग व लसीकरण कॅम्प प्राथमिक आरोग्यकेंद्र केम यांचे मार्फत घेण्यात आला होता. यामध्ये १६२ लोकांची टेस्ट करून लस देण्यात आली. यातील सर्व टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत.

येत्या १५ दिवसांनी कोविड टेस्ट व लसीकरण कँम्प घेण्यात येणार आहे. कंदरमधील किराणा दुकानदार आणि भाजी मंडई विकणाऱ्यांनी कोविड. टेस्ट करून घ्यावी, असे सरपंच प्रतिनिधी भास्करराव भांगे यांनी सांगितले.

यावेळी केम आरोग्य अधिकारी संतोष पालखे, आरोग्य सेवक दत्तात्रय कावळे, विकास डावखर, आरोग्य सेविका लिलाबाई मेंगाळ, सुवर्णा बरगे, सी एच ओ कंदर रोहिणी रणसिंग, आशा गटप्रवर्तक सविता गायकवाड, वनिता लोकरे- आशा, वैशाली कदम -आशा, नंदा लोकरे-आशा, सोनाली माने-आशा, मुन्नाबी शेख-आशा, सुनंदा लांडगे यांनी लसीकरण पूर्ण करण्यासाठी काम केले. तसेच विजय माने, दादासाहेब जगताप यांनी परिश्रम घेतले.

 


Share this Newz