डेअरी डे तर्फे आईस्क्रीम केक्‍सची नवीन श्रेणी सादर

Share this Newz

The Newz Biz Team, PUNE

डेअरी डे या कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा, महाराष्‍ट्र, गोवा व पाँडिचेरीमध्‍ये व्‍यापक उपस्थिती असलेल्‍या भारतातील टॉप १० आईस्क्रीम ब्रॅण्‍डने बाजारपेठेमध्‍ये ५०० मिली आईस्क्रीम केक्‍सची नवीन श्रेणी सादर केली. हे १०० टक्‍के व्हेजिटेरियन एगलेस आईस्क्रीम केक्‍स रेड वेल्‍वेट, चोको मोचा, चोको फॅन्‍टसी आणि हनी आल्‍मंड या ४ नवीन स्‍वादांमध्‍ये येत आहेत.

डेअरी डे चे सह-संस्‍थापक एम एन जगन्‍नाथ म्‍हणाले, ”आईस्क्रीम केक हा केक व आईस्क्रीम प्रेमींसाठी एक अनोखी ट्रीट आहे. डेअरी डे आईस्क्रीम केक ग्राहकांना दोन्‍ही मिष्‍टान्‍नांचा अनोखा स्‍वाद देतात, जे त्‍यांना खास अनुभव देतील. डेअरी डे ब्रॅण्‍ड आईस्क्रीम्‍सच्‍या अद्वितीय स्‍वादासाठी ओळखलाजातो आणि ब्रॅण्‍ड बाजारपेठेमध्‍ये नाविन्‍यपूर्ण उत्‍पादने सादर करण्‍यासाठी सतत प्रयत्‍न करतो. आम्‍ही यंदाच्‍या उन्‍हाळ्यामध्‍ये नवीन स्‍वाद व उत्‍पादनांचीशृंखला सादर करणार आहोत.”

रेड वेल्‍वेट, चोको मोचा, चोको फॅन्‍टसी आणि हनी आल्‍मंड आईस्क्रीम केक ५०० मिली आकारामध्‍ये उपलब्‍ध असतील. हे अद्वितीय नवीन फ्लेवर्स कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्‍ट्र, गोवा, आंध्रप्रदेश, तेलंगणा व पाँडिचेरीमधील ३०,००० हून अधिक आऊटलेट्समध्‍ये उपलब्‍ध आहेत.


Share this Newz