The Newz Biz Team, PUNE
पिंपळे गुरव येथील माजी नगरसेवक राजेंद्र जगताप मित्र परिवार व कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने पार्थ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कोविड लसीकरण मोहीम राबविण्यात आली.
सांगवी-पिंपळे गुरव परिसरातील 45 ते 60 वयोगटातील सर्वसामान्य नागरिकांना शासन नियमानुसार असलेली फी प्रतिष्ठानच्या वतीने भरून माकन रुग्णालयात कोविड लसीकरण मोहीम राबविण्यात आली. याप्रसंगी कोविड लसीकरण मोहिमेचे आयोजक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे यांच्या हस्ते नागरिकांना मास्क वाटप करून लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
परिसरातील 45 ते 60 वयोगटातील नागरिकांना वैद्यकीय सल्यानुसार कोविड लस घेण्याचे आवाहन राजेंद्र जगताप यांनी केले.









Leave a Review