The Newz Biz Team, PUNE
भारतातील ट्रम्प टॉवर्सचे विकासक ट्रीबेकाने द आर्क-व्हॉएज टू द स्टार्स या आपल्या पुणे येथील नवीन प्रकल्पातील टॉवर ए मधील सर्व घरे विकली आहेत. वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पातील टॉवर बी आणि टॉवर सी मधील घरांच्या किमती १ एप्रिलपासून वाढविण्यात येणार आहेत. ट्रीबेकाच्या पुणे येथील या पहिल्या-वहिल्या प्रकल्पाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या प्रकल्पासाठी राबविलेले अभियांत्रिकी कौशल्य आणि जागतिक दर्जाचा मिळालेला स्पर्श यामुळे तसेच या प्रकल्पाचे बांधकाम ज्या गतीने पुढे सरकत आहे, त्यामुळेसुद्धा हा प्रतिसाद मिळतो आहे.
ट्रीबेकाचे संस्थापक कल्पेश मेहता म्हणाले, अगदी कमी कालावधीतसुद्धा आम्हाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आणि तयार असलेले आमचे सर्व फ्लॅट विकले गेले आहेत. आम्ही हा सुरुवातीचा टप्पा पूर्ण केला असल्याने आम्हाला अधिकाधिक लोकांना या अतुलनीय अशा प्रकल्पामध्ये आता सामावून घ्यायचे आहे. १ एप्रिलपासून आम्ही त्यामुळे किमतींमध्ये वाढ करत आहोत. गेल्या दोन महिन्यांमध्ये या प्रकल्पातील बांधकामाचा वेग फार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्या माध्यमातून आम्ही आमच्या ठरलेल्या सर्व वेळा पाळणार आहोत.
द आर्क-व्हॉएज टू द स्टार्स हा पुण्याच्या बाजारपेठेतील अर्वाधिक मागणी असलेला आणि अलिशान असा प्रकल्प असून त्यामध्ये पाच टॉवर आहेत. हे पाचही टॉवर एकमेकांना भारतातील सर्वात मोठ्या अशा २.५ एकर आकाराच्या रुफटॉपने जोडले गेले आहेत. डिझाईन, स्पेस नाविन्यपूर्णता, वास्तुरचना आणि सेवा या वैशिष्ट्यांच्या बाबतीत जागतिक कौशल्याचा एक आगळा परिपाठ हा प्रकल्प घालून देतो. या प्रकल्पामध्ये ३ आणि ४ बेडरूम असलेली घरे उपलब्ध असून त्यांच्या किमती २ कोटी रुपयांपासून पुढे सुरु होतात.







Leave a Review