ओप्‍पो एफ१९ प्रो सिरीजच्‍या विक्रीला सुरूवात

Share this Newz

The Newz Biz Team, PUNE

एफ१९ प्रो सिरीजच्‍या यशस्‍वी लाँचनंतर ओप्‍पो या आघाडीच्‍या जागतिक स्‍मार्ट डिवाईस ब्रॅण्‍डने १७ मार्च २०२१ पासून एफ१९ प्रो + ५जी आणि एफ१९ प्रो ची विक्री सुरू होण्‍याची घोषणा केली. एफ सिरीज वारसा कायम ठेवत एफ१९ प्रो + ५जी आणि एफ१९ प्रो सर्वोत्तम तंत्रज्ञान व आकर्षक सडपातळ डिझाइनसह तुमची वैयक्तिक स्‍टाइल व स्‍पीडसंदर्भातील गरजांना अनुसरून डिझाइन करण्‍यात आले आहेत.

एफ१९ प्रो + ५जीमध्‍ये एआय हायलाइट पोर्ट्रेट व्हिडिओ, स्‍मार्ट ५जी, ५० वॅट फ्लॅश चार्ज आणि ओप्‍पोचे प्रोप्रायटरी सिस्‍टम परफॉर्मन्‍स ऑप्टिमायझर अशी सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत. ही वैशिष्‍ट्ये ग्राहकांच्‍या मध्‍यम-विभागातील स्‍मार्टफोनबाबतच्‍या अपेक्षांमध्‍ये बदल करतात.

ओप्‍पो एफ१९ प्रो + ५जी २५,९९० रूपये किंमतीमध्ये उपलब्ध आहे आणि ओप्‍पो एफ१९ प्रोची किंमत २१,४९० रूपये (८ +१२८ जीबी) व एफ१९ प्रोची किंमत २३,४९० रूपये (८ +२५६जीबी) आहे. १७ मार्चपासून या स्‍मार्टफोन्‍सच्‍या विक्रीला सुरूवात होत आहे. ओप्‍पो एफ१९ प्रो प्‍लस ५जी ८ जीबी रॅम व १२८ जीबी स्‍टोरेजसह स्‍पेस सिल्‍व्‍हर व फ्लूइड ब्‍लॅक या दोन आकर्षक रंगांमध्‍ये येईल. ओप्‍पो एफ१९ प्रो + ५जी प्रमुख रिटेलर्स व अॅमेझॉनवर उपलब्‍ध असेल, तर ओप्‍पो एफ१९ प्रो प्रमुख रिटेलर्स, अॅमेझॉन, फ्लिपकार्ट व इतर प्रमुख ई-कॉमर्स व्‍यासपीठांवर आकर्षक ऑफर्ससह उपलब्‍ध असेल.

या अत्‍यंत सडपातळ फोनचे आकारमान ७.८ मिमी x ७३.४ मिमी x १६०.१ मिमी आहे आणि १७३ ग्रॅम इतके अल्‍ट्रा-लाइट वजन आहे. मागील बाजूस असलेल्‍या वन-पीस क्‍वॉड कॅमे-यावर गोरिला ग्‍लास ५च्‍या सिंगल पीसचे कव्‍हर आहे, जे कॅमे-याला आकर्षक लुक देण्‍यासोबत कोमल स्‍पर्शाचा अनुभव देते. २४०० x १०८० एफएचडी+ सुपर एएमओएलईडी डिस्‍प्‍ले आणि ९०.८ टक्‍के स्क्रिन-टू-बॉडी रेशोच्या माध्‍यमातून एफएचडीमध्‍ये अधिक सुस्‍पष्‍ट व्हिडिओज पाहण्‍याचा व गेम्‍स खेळण्‍याचा आनंद मिळतो. तुमच्‍या गतीशील जीवनशैलीला अनुसरून फोनमध्‍ये ४,३१० एमएएच क्षमतेची बॅटरी आहे, जिच्‍यासोबत ५० वॅट फ्लॅश चार्ज तंत्रज्ञान येते. ज्‍यामुळे तुम्‍हाला फक्‍त ५ मिनिटांच्‍या चार्जिंगमध्‍ये ५ तासांचा टॉकटाइम, ३.५ तासांचा व्हिडिओ प्‍लेबॅक आणि १.५ तास इन्‍स्‍टाग्राम वापरण्‍याची खात्री मिळते. ओप्‍पो एफ१९ प्रो + ५जी अत्‍यंत सानुकूल, कार्यक्षम, इंटेलिजण्‍ट आणि वैशिष्‍ट्यांसह डिझाइन करण्‍यात आलेली अँड्रॉइड आधारित मोबाइल ओएस कलरओएस ११.१ वर संचालित आहे, ज्‍यामधून सुलभ व कार्यक्षम अनुभव मिळतो. तसेच मीडियाटेक डायमेन्सिटी ८००यू प्रोसेसरमधून डिवाईसला अधिक शक्‍ती मिळण्‍याची खात्री मिळते.


Share this Newz